गडचिरोली: पोलीस नक्षल चकमकीत ४ नक्षली ठार

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि. २७ ऑगस्ट)
दि. २५ ऑगस्ट रोजी गडचिरोली–नारायणपूर सीमेवरील कोपर्शी जंगल परिसरात पोलीस नक्षल यांच्यात सुमारे आठ तास चकमक झाली.गडचिरोली विभागाचे गट्टा दलम, कंपनी क्रमांक १० व इतर नक्षली दबा धरून बसले असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर अपर पोलीस अधीक्षक एम. रमेश यांचे नेतृत्वाखाली सी-६० ची १९ पथके आणि CRPF QAT ची २ पथके सदर जंगल परिसरात रवाना करण्यात आली होती.
आज सकाळी सदर जंगल परिसरात पोहोचून शोध मोहीम राबवत असताना नक्षल्यानी पोलीस पथकांवर अंदाधुंद गोळीबार सुरू केला.ज्याला पोलीस पथकाने प्रभावी प्रत्युत्तर दिले. सुमारे आठ तास चाललेल्या चकमकीनंतर सदर परिसरात शोध घेतला असता एकूण ४ जहाल नक्षल्याचे मृतदेह (१ पुरुष आणि ३ महिला) मिळाले.
घटनास्थळावरून नक्षली साहित्य जप्त
!!
१.SLR रायफल, २. INSAS रायफल व १, ३०३ रायफल जप्त करण्यात आले आहेत.सदर भागात उर्वरित नक्षल्यांचा शोध घेण्यासाठी नक्षली विरोधी अभियान सुरू आहे.
