ब्रेकिंग न्युज
लोकसभा गडचिरोली -चिमूर (अ. ज.) क्षेत्रात भाजपा कडून अशोक नेते ना उमेदवारी

लोकशाही न्युज, गडचिरोली(दि,२४ मार्च)
आगामी लोकसभा २०२४ च्या निवडणुकीसाठी गडचिरोली-चिमूर (अ. ज.)क्षेत्रातून भारतीय जनता पार्टीने अशोक नेते यांच्या नावाची उमेदवारी घोषित झाली.
येत्या एप्रिल १९ एप्रिल ला होऊ घातलेल्या पहिल्या टप्यातील निवडणुकीमध्ये थेट काँग्रेसच्या नामदेव किरसान विरुद्ध भारतीय जनता पार्टीचे अशोक नेते यांच्यात काट्याची टक्कर होणार आहे. दोन्ही तगडे उमेदवार असल्याने निवडणुकीमध्ये रंगत निर्माण होणार आहे.
विद्यमान खासदार अशोक नेते यांच्या गडचिरोली- चिमूर लोकसभा क्षेत्रातील उमेदवारीने पदाधिकारी व कार्यकर्त्यात जल्लोषाचे वातावरण आहे.
जाहिरात
