बिआरएसपी कडून विनोद मडावी यांचा उमेदवारी अर्ज दाखल

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि,२२ मार्च)
लोकसभा निवडणूक २०२४ गडचिरोली-चिमूर या क्षेत्रात १९ एप्रिल ला पहिल्या टप्यात होणाऱ्या निवडणुकांसाठी आज गडचिरोली-चिमूर (अ. ज.)मतदारसंघात आज दोन नावनिर्देश अर्ज दाखल करण्यात आले.
लोकशाही विरोधी भारतीय जनता पक्षाला सत्तेतून हद्दपार करण्यासाठी इंडिया आणि महाविकास आघाडीतर्फे कोणत्याही प्रकारची एकवाक्यता नसल्याने आणि बहुजन – आंबेडकरी पक्षांना सोबत घेऊन चालण्याचे धोरण नसल्याने बाबासाहेबांना अपेक्षित असलेला समाज उभा करण्याच्या विचाराने बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पक्षातर्फे गडचिरोली – चिमूर लोकसभा मतदारसंघा करीता आज युवा नेते विनोद गुरुदास मडावी यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला.
यावेळी बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पक्षाचे जिल्हा प्रभारी राज बन्सोड, जिल्हाध्यक्ष मिलिंद बांबोळे, जिल्हा उपाध्यक्ष अरविंद वाळके, पुरुषोत्तम रामटेके, प्रफुल्ल रायपुरे, महिला शहर अध्यक्ष विद्या वाळके, रेखा कुंभारे, शोभा खोब्रागडे, नागसेन खोब्रागडे, सतिश दुर्गमवार, सरपंच देवीदास मडावी, धनराज दामले, प्रतिभा दामले, प्रकाश मडावी, सुरज ठाकरे प्रामुख्याने उपस्थित होते.
.
