जाहिरात
ब्रेकिंग न्युज

डॉ.नामदेव उसेंडी यांचा महाराष्ट्र प्रदेश आदिवासी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा

Spread the love

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि,२६ मार्च)

आगामी लोकसभा २०२४ गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राची पक्षश्रेष्ठीकडून उमेदवारी न मिळाल्यामुळे नाराज झालेले माजी आमदार डॉ नामदेव उसेंडी यांनी महाराष्ट्र प्रदेश आदिवासी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा शिवाजीराव मोघे यांच्याकडे सादर केला आहे. राजीनामा दिल्याची माहिती आज त्यांच्या निवासस्थानी झालेल्या पत्रकार परिषदेत नामदेव उसेंडी यांनी माहिती दिली. पत्रकार परिषदेला जिल्हा परिषद माजी अध्यक्ष बंडोपंत मल्लेलवार,काशिनाथ भडके हे हजर होते.

त्यांच्या राजीनाम्यानंतर लगेच चिमूर क्षेत्राचे आमदार कीर्तीकुमार भांगडिया त्यांच्या भेटीला त्यांच्या निवासस्थानी हजर झाले त्यांच्यामध्ये बंद दारात चर्चा झाल्यात.डॉ. नामदेव उसेंडी भाजपा प्रवेश करतात की काय नजरा लागलेल्या आहेत.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button