जाहिरात
गडचिरोलीताज्या घडामोडी

२५ वर्षीय तरुणाने विहिरीत उडी मारून केली आत्महत्या

Spread the love

लोकशाही न्युज, गडचिरोली(दि,२६ मार्च)
गडचिरोली शहरापासून अवघ्या ६ किलोमीटर अंतर असलेल्या नवेगाव, मुरखळा येथील बंद असलेल्या राईस मिल परिसरातील विहिरीत २५ वर्षीय तरुणाचे प्रेत मिळाल्याने खळबळ उडाली आहे.

प्राप्त माहितीनुसार, मृतकाचे नाव मनोज सुधाकर जेंगठे (वय २५ वर्ष) असून  हा तरुण होळी सणाच्या च्या दिवसापासून बेपत्ता होता, दि,२६ मार्च ला विहिरीच्या समोर चप्पल आढळून आल्याने त्याचा शोध घेतला असता विहिरीत त्याचा मृतदेह मिळाला. मृतक हा अविवाहित होता.मृतक हा वाहन चालवण्याचे काम करीत होता.

पोलीस पंचनाम्यानंतर शवउत्तरीय तपासणी करीता जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे हलविण्यात आला आहे.पुढील तपास गडचिरोली पोलीस निरीक्षक अरुण फेंगडे यांच्या मार्गदर्शनात सुरु आहे.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button