जाहिरात
गडचिरोलीताज्या घडामोडी

महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेलगत पोलीस नक्षलवादी चकमक

Spread the love

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि,२८ मार्च)

पोलिसांना काल २७ मार्च ला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे कसनसुर चातगाव दलम आणि छत्तीसगड मधील औंधी दलमचे काही सशस्त्र नक्षलवादी हे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर घातपात करण्याचा उद्देशाने उप-पोस्टे कसनसुर पासुन उत्तर-पुर्वेस १५ कि.मी. व पोस्टे जारावंडी पासुन दक्षिण- पुर्वेस १२ कि.मी. अंतरावर असलेल्या महाराष्ट्र व छत्तीसगड सीमेवरील भुमकन गावाजवळ तळ ठोकुन आहे.

पोलीस अधीक्षक (प्रशासन) शकुमार चिंता यांच्या नेतृत्वात विशेष अभियान पथकाचे ८ पथक व सीआरपीएफ चे १ क्युएटी सह सदर जंगल परिसरात नक्षलवाद विरोधी अभियान सुरु करण्यात आले.

महाराष्ट्र- छत्तीसगड सीमेतील जंगल परिसरात शोध मोहिम सुरु असतांना  नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलावर अंदाधुंद गोळीबार केला. त्या गोळीबारास अभियान पथकाने जोरदार प्रत्युत्तर दिले. काल रात्री ६ वाजेपासून मध्यरात्री ११:३० पर्यंत आणि आज पहाटे ४:३० वा च्या अंधारात गोळीबार सुरुच होता. सदर चकमकीमध्ये नक्षलवादयांनी अभियान पथकावर बीजीएल (एक्रख्र्) मारा केला. परंतु अभियान पथकाने त्यास जोरदार प्रत्युत्तर दिले. अभियान पथकाचा वढता दबाव पाहुन अंधाराचा फायदा घेवुन नक्षलवादी घटनास्थळावरुन पसार झाले.

आज सकाळी घटनास्थळावर शोध मोहिम राबविण्यात आली. यात मोठया प्रमाणावर माओवादी सामान, साहित्य, वायर, जिलेटीन स्टीक्स, बॅटरी, सोलर पॅनल साहित्य जप्त करण्यात आले. सदर अभियानामध्ये सहभागी जवानांच्या या शौर्यपूर्ण कामगिरीचे पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी कौतूक केले आहे.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button