गडचिरोलीब्रेकिंग न्युज
दुचाकीच्या समोरासमोर धडकेत ५ जखमी, प्राणहानी नाही

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि,४ मार्च)
गडचिरोली शहरातील इंदिरानगर परिसरात (वन विभाग नाक्याजवळ) सायंकाळी ७ च्या सुमारास समोरासमोर दोन दुचाकीची धडक होऊन ५ जखमी झाल्याची नुकतीच घटना घडलेली आहे.
जखमी झालेल्यांची नावे नरेंद्र विक्रम सरकटे रा. लांझेडा,श्याम वामन श्रीपतवार रा. रामनगर हे दोघे दुचाकीने धानोरा मार्गे गडचिरोली येत होते. हे दोघे मद्यप्राशन करून गाडी चालवत असल्याने समोरून येणाऱ्या शाळकरी मुलांना धडक दिली.

(अपघातात चकणाचुर झालेले दुचाकी वाहन)
दुसऱ्या दुचाकी वरील ३ व्यक्ती सर्वसाधारण जखमी झालेले आहेत त्यांची नावे बातमी लिहिस्तोवर वर कळू शकलेली नाहीत. सर्व जखमींना रुग्णवाहिकेने जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये उपचारासाठी नेण्यात आले आहे.
पुढील तपास गडचिरोली पोलीस स्टेशन करीत आहे.
जाहिरात
