जाहिरात
आपला जिल्हागडचिरोली

जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगारांना कामाचे वाटप करा, आमदार डॉ. देवराव होळी यांची मागणी

Spread the love

लोकशाही न्युज,गडचिरोली (दि,६ मार्च)

गडचिरोली जिल्हा हा उद्योग विरहीत जिल्हा असल्यामुळे जिल्ह्यातील अनेक सुशिक्षित बेरोजगारांच्या हाताला काम नसल्यामुळे वाईट मार्गाने जात असल्याचे चित्र गडचिरोली जिल्ह्यात पहावयास मिळत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील विविध शासकीय कार्यालयातून सुशिक्षित बेरोजगारांना नियमाप्रमाणे कामे देण्यात यावे, अशी मागणी आज सुशिक्षित बेरोजगार संघटनेतून बैठकीतून आ. डॉ. देवराव होळी यांनी केली.

या बैठकीला जिल्ह्यातील शेकडो सुशिक्षित बेरोजगार तरूण उपस्थित होते. या बैठकीचे नेतृत्व करीत आमदार डॉ. होळी म्हणाले की, सुशिक्षित बेरोजगारांना नियमाप्रमाणे ३३ टक्के कामे प्रत्येक विभागांनी द्यावी, जेणेकरून जिल्ह्यातील शेकडो सुशिक्षित बरोजगारांना कामे मिळतील. सद्यस्थितीत प्रत्येक विभागात कोणत्याही प्रकारचे नियमाप्रमाणे कामचे वाटप होत नसल्याची तक्रार वारंवार सुशिक्षीत बेरोजगार अभियंताकडून प्राप्त होत आहेत. त्यामुळे आता खुल्यांना ३३.३० टक्के, मजुरी सहकारी संस्थेला ३३.३० टक्के तसेच सुशिक्षित बेरोजगार युवकांना ३३.३० टक्के कामे द्यावीत, अन्यथा माझ्या नेतृत्वात मोठे आंदोलन सुशिक्षित बेरोजगारांकडून करण्यात येईल, असे आवाहन देखील यावेळी आ. डॉ. देवराव होळी यांनी केले.

सदर बैठकीत सुशिक्षित बेरोजगाराकरिता पहिल्यांदाच आमदार डॉ. देवराव होळी यांनी कामे देण्याबाबत आवाज उठावला आहे, असे यावेळी सुशिक्षित बेरोजगारांकडून मत व्यक्त करून आमदार डॉ. होळी यांचे आभार मानले. येत्या ८ दिवसांत प्रत्येक विभागाला शासनाने ठरवून दिलेल्या नियमानुसार निविदा प्रक्रिया पार पाडण्यास सुरुवात करावी, असे देखील यावेळी आमदार डॉ. देवराव होळी यांनी बैठकीत आव्हान केले.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button