गडचिरोली (दि, ११ ऑक्टोंबर)
सुरजागड प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या १३ गावाच्या विस्थापनाची जन सुनावणी जिल्हास्तरावर न घेता तालुकास्तरावर एटापल्ली येथे घेण्यात यावी ही प्रमुख मागणी . कोनसरी प्रकल्प सुरू झाल्याशिवाय जिल्ह्यातील सुरजागड येथील कच्चामाल परराज्यात व जिल्हा बाहेर नेऊ नये. कोनसरी येथे सीसीटीव्ही असलेला चेक नाका बसवण्यात यावा अशा प्रकारच्या अनेक मागण्या घेऊन जिल्हा काँग्रेस २१ ऑक्टोबरला आष्टी येथे मुख्य चौकात चक्काजाम आंदोलन करणार आहे.
अशी माहिती आज झालेल्या पत्रकार परिषदेत जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी दिली आहे.
पत्रकार परिषदेला नामदेव किरसान प्रदेश महासचिव महाराष्ट्र राज्य, डॉ. नितीन कोडवते,आनंदराव गेडाम माजी आमदार, रजनीकांत मोटघरे, सतीश विधाते शहर अध्यक्ष, मनोहरराव कोरेटी जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष,पांडुरंग घोटेकर, अड, विजय चाटे, शामराव चापले, शाम शेरखान पठाण, गुलाबराव मडावी, देवाजी सोनटक्के, वामनराव सावसाकडे, सुरेश भांडेकर,हरबाजी मोरे, भैय्याजी गडमवार, कल्पना नंदेश्वर,आशा मेश्राम, वसंत राऊत, कृष्णा जंजाळ, दिवाकर मेश्राम, धानोरकर व आदी कार्यकर्त्याची पत्रकार परिषदेला आवर्जून हजेरी होती .
(पत्रकार परिषदेत माहिती देताना जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे व इतर पदाधिकारी )
सर्व शेतकरी बांधव, नागरिक, महिला भगिनी, व्यापारी बंधू, शोषित युवक,जिल्हा काँग्रेसचे पदाधिकारी हे सर्व सेलचे अध्यक्ष, तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष व कार्य हजारोंच्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे .
