जाहिरात
ताज्या घडामोडी

श्रीमती सिंधुताई पोरेड्डीवार विद्यालयात क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती साजरी

Spread the love

लोकशाही न्युज, गडचिरोली/गोगाव (दि. ११ एप्रिल)

प्रगती महिला मंडळ गडचिरोली द्वारा संचालित श्रीमती सिंधुताई पोरेड्डीवार हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय गोगाव येथे क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. सर्वप्रथम महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन विद्यालयाच्या प्राचार्या विजया मने यांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी संकलित मूल्यमापन २ परीक्षा करिता आलेल्या शिक्षकांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांना महात्मा फुले यांच्या जीवन कार्याची प्रेरणा, शिक्षणाचे महत्त्व आणि परीक्षेचे नियोजन याबाबत मोलाचे मार्गदर्शन केले.कार्यक्रमाची सांगता करून संकलित मूल्यमापन २ आणि इयत्ता ९ वी व ११ वी च्या वार्षिक परीक्षेला सुरुवात करण्यात आली.

प्रसंगी पर्यवेक्षक म्हणून प्रतिभा रामटेके, रोहिणी डोहणे, कांबरे, डॉ. स्वप्नील मलोडे,सहाय्यक शिक्षिका वनिता विगम, प्रा. धर्मेंद्र मूनघाटे, प्रा. मुकुंद नंदनपवार, प्रा. कल्पना धोडरे, प्रा. वैशाली पुणेकर, साईनाथ कूनघाडकर, अक्षदा चडगुलवार, मृणाली गेडाम, अविनाश चडगुलवार, रवी मूनघाटे, वसंत जरूरकर, फुलचंद सहारे, वामन गंडाटे आदी शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button