जाहिरात
ताज्या घडामोडी

गडचिरोली: नालीसफाई विशेष मोहिमेला प्रारंभ

नगराध्यक्ष अॅड. प्रणोती निंबोरकर यांचा पुढाकार

Spread the love

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि. १० एप्रिल)

गडचिरोली शहरातील स्वच्छता व आरोग्य व्यवस्थेला बळकटी देण्यासाठी नगराध्यक्ष अॅड. प्रणोती निंबोरकर यांच्या पुढाकारातून नालीसफाई विशेष मोहिमेला उत्साहात सुरुवात करण्यात आली. या मोहिमेच्या पहिल्या दिवशी प्रभाग क्रमांक ५, विवेकानंद नगर येथे प्रत्यक्ष कामाला प्रारंभ झाला.

शहर स्वच्छ, निरोगी आणि सुंदर ठेवण्याच्या उद्देशाने राबवण्यात येणाऱ्या या उपक्रमात स्थानिक प्रशासन आणि लोकप्रतिनिधी सक्रियपणे सहभागी झाले आहेत. नगराध्यक्ष अॅड. प्रणोती निंबोरकर यांनी स्वतः उपस्थित राहून नालीसफाई कामांची पाहणी केली आणि संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या.

यावेळी नगरसेवक सागर निंबोरकर तसेच नगरसेविका सीमा कन्नमवार यांचीही प्रमुख उपस्थिती होती. सर्वांनी मिळून परिसरातील नाल्यांची स्वच्छता, अडथळे दूर करणे आणि साचलेला कचरा हटविण्याच्या कामाचा आढावा घेतला.

नगराध्यक्ष प्रणोती निंबोरकर यांनी नागरिकांशी थेट संवाद साधत स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले. “स्वच्छता हीच खरी सेवा” या भावनेतून प्रत्येक नागरिकाने आपला परिसर स्वच्छ ठेवण्यास हातभार लावावा, असे आवाहन त्यांनी केले. नाल्यांमध्ये कचरा टाकू नये, प्लास्टिकचा वापर टाळावा आणि शहर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, अशी जनजागृतीही करण्यात आली.

प्रभाग क्रमांक ५ पासून सुरू झालेली ही विशेष मोहीम टप्प्याटप्प्याने संपूर्ण शहरात राबविण्यात येणार असून, पावसाळ्यापूर्वी सर्व नाल्यांची सखोल स्वच्छता करून नागरिकांना सुरक्षित व स्वच्छ वातावरण उपलब्ध करून देण्याचा प्रशासनाचा मानस आहे.

नगराध्यक्ष प्रणोती निंबोरकर यांच्या नेतृत्वाखाली गडचिरोली शहर स्वच्छतेच्या दिशेने ठोस पावले उचलत असल्याचे स्पष्ट होत असून, या उपक्रमाचे नागरिकांकडूनही स्वागत केले जात आहे.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button