गडचिरोली : कारगिल चौकात कार पलटून चालक जख्मी

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि. २७ मार्च)
चंद्रपूर मार्गावरील कारगिल चौकात गुरूवारी मध्यरात्री (दि.२६) रात्री १२ च्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात एक भरधाव कार रस्त्यालगत असलेल्या लोखंडी कठड्यांना धडक देऊन हवेत उडाली सुदैवाने जीवितहानी झाली नाही.त्यानंतर पालथी पडून फरफटत कारगिल चौकात रस्त्याच्या मधोमध थांबली.अपघातात चालक गंभीर जखमी झाला असला तरी तो बचावला आहे.
प्राप्त माहितीनुसार, मारुती सुझुकी कंपनीची सेलेरिओ कार (क्रमांक एम. एच. -३१-ई के -५९९1) ही चंद्रपूर मार्गाने शहराकडे भरधाव वेगात येत होती. यावेळी कारमध्ये चालक देव राहुल महात्मे (२२ वर्ष) हा एकटाच होता. कारगिल चौकात त्याचे कारवरील नियंत्रण सुटले आणि ती कार डाव्या बाजुच्या कठड्यांना धडक देऊन उडाली आणि उलटून समोरच्या भारावर खाली कोसळली. सुदैवाने त्यावेळी रस्त्यावर दुसरे कोणतेही वाहन किंवा कोणी व्यक्त नसल्याने अनर्थ टळला. मात्र कारचालक गंभीर जखमी झाला. त्याच्या कमरेला व पाठीला गंभीर फ्रॅक्चर झाल्याचे सांगण्यात आले. कारचा समोरील भाग पूर्णपणे चक्काचुर झाला.
चालक मद्यपान करून होता का, हे पोलीस तपासात पुढे येईल. पुढील तपास गडचिरोली पोलीस करत आहेत.
