जाहिरात
ताज्या घडामोडी

गडचिरोली : २१ मार्च ला समतेचा सांस्कृतिक महोत्सव

डॉ. अनिरुद्ध वनकर यांच्यासह पंधरा कलावंत सादर करणार संविधानाची गाणी

Spread the love

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि.१९ मार्च)

सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभाग महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या ‘घरघर संविधान मेळावा’ या उपक्रमा अंतर्गत ‘संविधानाचे ७५ वर्ष’ व महाड येथील चवदार तळ्याच्या सत्याग्रहाच्या ९९ वर्षा निमित्त ‘समतेच्या विचारांचा सांस्कृतिक महोत्सव’ शनिवार २१ मार्च रोजी सायंकाळी ६ ते १० वाजता दरम्यान संविधान चौक कन्नमवार नगर येथे आयोजित करण्यात आला आहे. अशी माहिती (दि. १८ मार्च) ला झालेल्या प्रेस क्लब येथे आयोजित पत्रकार परिषदेच्या माध्यमातून डॉ. अनिरुद्ध वनकर यांनी दिली आहे.

या विशेष कार्यक्रमात महाराष्ट्रातील प्रसिद्ध अभिनेता, गायक, निर्माता व दिग्दर्शक तसेच आंबेडकरी चळवळतील लोकप्रिय कलावंत डॉ. अनिरुद्ध वनकर यांच्या नेतृत्वाखाली १५ कलावंतांचा भव्य सांस्कृतिक जलसा सादर होणार आहे. “शिवराय ते भिमराय” आणि “बौद्ध भीम गीताचा जलसा” या विशेष सादरीकरणामधून संविधान, समता आणि सामाजिक न्यायाचे विचार जनमाणसात रुजविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

या सांस्कृतिक महोत्सवात मुंबई येथील प्रसिद्ध अभिनेत्री डॉ. कोमल धांडे, नेहा गाडे तसेच लातूर येथील धम्मा तिगोटे यांच्यासह नामांकित कलावंत सहभागी असणार आहेत. या सर्व कलाकारांचा संच लोकजागृती नाट्यकाला संस्थेच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचे कार्य करत असून गडचिरोली सारख्या दुर्गम भागात येथे निशुल्क कार्यक्रम सादर करत आहेत.

कार्यक्रमाला आमदार डॉ. मिलिंद नरोटे, खासदार डॉ. नामदेव कीरसान, गडचिरोलीच्या नगराध्यक्ष प्रणोती निंबोरकर, योगेंद्र शेंडे सहाय्यक आयुक्त स्किल डेव्हलपमेंट कौशल्य विभाग, डॉ. अनिल हिरेकन कुलसचिव गोंडवाना विद्यापीठ, रोहिदास राऊत जेष्ठ पत्रकार व आंबेडकरी विचारवंत, किशोर वडेट्टीवार, राम मेश्राम हे उपस्थित असणार आहेत.

या होणाऱ्या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन लोक जागृती नाट्य संस्थेचे अध्यक्ष डॉ. अनिरुद्ध वनकर यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केले आहे.पत्रकार परिषदेला अंकुश शेडमाके, चेतन रामटेके,सिद्धार्थ गोवर्धन, सुधीर जांभुळकर, नागसेन खोब्रागडे उपस्थित होते.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button