डॉ. देवराव होळी यांची भाजपा आदिवासी आघाडीच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती

लोकशाही न्युज,गडचिरोली (दि. २५ जानेवारी)
भाजपा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष तथा गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार डॉ. देवराव होळी यांची नुकतीच भाजपा आदिवासी आघाडीच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
डॉ. देवराव होळी हे पक्षाशी कायम एकनिष्ठ राहिले असून त्यांनी संघटनात्मक पातळीवर सातत्याने काम केले आहे. विशेषतः आदिवासी समाजातील त्यांची मजबूत पकड, तळागाळातील कार्यकर्त्यांशी असलेला संपर्क आणि गडचिरोली परिसरातील विकासकामांमधील सक्रिय सहभाग लक्षात घेऊन त्यांची आदिवासी आघाडीच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले.
डॉ. देवराव होळी यांनी पक्ष नेतृत्वाने दिलेल्या जबाबदारीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि पक्ष संघटना अधिक बळकट करण्यासाठी पूर्ण क्षमतेने कार्य करण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला.
डॉ. देवराव होळी यांच्या या निवडीमुळे गडचिरोलीच्या भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले आहे.
