जाहिरात
आपला जिल्हा

लॉयड्सतर्फे ७७७ जणांनी केलं रक्तदान

Spread the love

लोकशाही न्युज, कोनसरी / सुरजागड (दि. १८ एप्रिल)

सामाजिक बांधिलकी आणि समुदाय कल्याणाबाबतची आपली ठाम भूमिका अधोरेखित करत, लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडची सीएसआर शाखा लॉयड्स इन्फिनिट फाउंडेशनने कोनसरी आणि सुरजागड येथे मेगा रक्तदान शिबिराचे यशस्वी आयोजन केले.

या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून ७७७ जणांनी स्वेच्छेने रक्तदान केले. त्यामुळे हा उपक्रम करुणा आणि सामूहिक जबाबदारीचा प्रेरणादायी नमुना ठरला. मागील वर्षी ५०१ जणांनी रक्तदान केले होते.

लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक बी. प्रभाकरन यांनी स्वतः प्रथम रक्तदान करून आदर्श निर्माण केला. त्यांच्या या कृतीतून रक्तदान हे मानवजातीसाठी अत्यंत मौल्यवान कर्तव्य असल्याचा संदेश त्यांनी दिला, ज्यामुळे इतरांनाही प्रेरणा मिळाली.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button