घोट वनपरिक्षेत्राधिकारी यांची पदभाराची व अभिलेख गहाळ प्रकरणी एफ आय आर नोंदवून निलंबित करण्यात यावे:-डाॖॅ.नामदेव वसंताबाई भिकाजी खोब्रागडे विभागीय अध्यक्ष बहुजन अधिकारी कर्मचारी महासंघ गडचिरोली यांची मागणी
गडचिरोली (दि,३१ ऑगष्ट)
उपरोक्त विषयांच्या अनुषंगाने आपणास आग्रह पूर्वक निवेदन देण्यात येत आहे की,२००५च्या माहिती अधिकार कायदया अंतर्गत प्राप्त माहितीनुसार १) २कोटी वृक्षारोपण आक्टोबर २०२१, २) रोपवन वर्षे २०१६ (२कोटी वृक्षारोपण , 3 ) रोपवन वर्षे २०१७,(४कोटी वृक्षारोपण)४) रोपवन वर्षे २०१८ ,(१३ कोटी वृक्षलागवड) ५) रोपवन वर्षे २०१९,(३३कोटी वृक्षारोपण)६) रोपवन वर्षे२०२१ पावसाळा आदि वनपरिक्षेत्र घोट कार्यालयातून प्राप्त झालेली आहे.
प्राप्त माहिती अवलोकनावरून वरील १,२,३ या कालावधीत झालेल्या रोपवन वृक्षांची जीवंत रोपे असण्या ऐवजी मृत्यू वृक्षांची सरासरी जास्त आहे, हे स्पष्ट दिसत आहे.तसेच या वनपरिक्षेत्रात शासनाचे करोडो रुपये खर्च झाल्याची बाब स्पष्ट दिसत आहे.
वृक्षलागवड क्षेत्र, शासन निधी खर्च विवरण,मजूर यादी, गावनिहाय,दिलेले पेमेंट , ग्राम सभेचा व वनहक्क ठराव ,विडींगसाठी लावलेले मजूर यादी,पूर्णत्वाचे दाखले, वनपरिक्षेत्राधिकारी, वनपाल,व वनरक्षक यांची दैनंदिनी ,लागबूक ,हलचल बूक, Acf, DCF and CCF यांच्या भेटीचा अहवाल, आणि रोपवन पुस्तीका आदि कोणत्याही प्रकारचे महत्वपूर्ण अभिलेख उपलब्ध नाही असे या कार्यालयाने कळविले आहे.तसेच
शासनाचे करोडो रुपये विकास कामांवर खर्च करून कार्यालयात लेखापरीक्षण अहवाल पासून अन्य महत्त्वपूर्ण अभिलेख उपलब्ध नसणे ही प्रशासकीय गंभीर स्वरूपाची बाब असून या प्रकरणामध्ये सहाय्यक वनसंरक्षक व उपवनसंरक्षक आलापल्ली वनविभाग यांचा मोठ्या प्रमाणात पाठिंबा असल्याची चर्चा लोकात सुरू आहे. आलापल्ली वनविभागाचे सहाय्यक वनसंरक्षक व उपवनसंरक्षक यांच्या २००२ च्या सामान्य प्रशासन, च्या शासन निर्णयानुसार आदिवासी व नक्षलग्रस्त भागात वारंवार भेट देऊन प्रशासन भ्रष्टाचारमुक्त करणे आणि वनकर्मचारी योग्य काम करतात कीवा नाही याची पाहणी करणे व वनकर्मचारी यांचे मनोबल वाढविणे अशी स्पष्ट शासन निर्णयात तरतूद असतांना वरिष्ठ पातळीवरील अधिकारी स्व:तच स्वफायद्यासाठी दुर्लक्ष करतात आणि शासन निर्णयाचे उल्लंघन करून चिरीमिरी करण्यासाठी मार्ग मोकळा करून देण्याची शक्यता नाकारता येत नाही.तसेच pccf ,Apccf व CCF यांच्या पातळीवरून सिरोंचा , भामरागड,व आलापल्ली वनविभागाची गोपनीय चौकशी केल्यास अनेक गंभीर स्वरूपाची प्रकरणे बाहेर येऊन लोकांना न्याय मिळेल आणि वनविभागाला भ्रष्टाचाराची लागलेली किड थांबेल आणि वनविभागाची मलिन झालेली प्रतिमा उज्वळ व सोज्वळ होण्यात शासन , प्रशासन, वनकर्मचारी,व लोकांचे हित आहे.
मा.वनसरक्षक या नात्याने एम.व्हि .गोन्नाडे घोट वनपरिक्षेत्राधिकारी यांना सदर प्रकरणी महाराष्ट्र सार्वजनिक अभिलेख अधिनियम २००५ च्या कलम ८, महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम १९७९च्या कलम ३ व २००५ च्या बदली अधिनियम व दप्तर दिरंगाई कायद्याचे कलम १०,(२,३) च्या उल्लंघन प्रकरणी दोषी ठरवून चौकशी करावी व त्यांच्यावर अभिलेख प्रकरणी FIR नोंदवावा व तसेच त्यांच्या रुजू होतांना घेतलेल्या पदभाराची चौकशी करून कठोर कारवाई करावी आणि अकार्यक्षमतेचा ठपका ठेवून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
मा .
