शांतता बैठकीत लोकप्रतिनिधी व डि.वाय.एस.पी (पोलीस)यांचात खडाजंगीःशांतता बैठक की वादळाची
गंगाखेड प्रतिनिधी (दि,२९ ऑगष्ट)
श्री संत जनाबाई महाविद्यालयात लोकप्रतिनिधी यांच्या हट्टापोटी दुसऱ्यांदा घेण्यात आलेल्या शांतता कमिटीचा बैठकीत लोकप्रतिनिधी व डिवायएसपी (पोलीस)यांची चांगलीच खडाजंगी झाल्याने गणेशोत्सवाची शांतता बैठकीतच अशांतता वारवांर होत आसल्याने शहरात वेगळीच चर्चा रंगत आहे.

गणेशोत्सवानिमित्त शहरांसह व तालुक्यात गणेश उत्सव शांततेत साजरा व्हावा यासाठी पोलिस प्रशासन , तहसिल प्रशासनाने शांतता कमिटीच्या बैठकीचे आयोजन संत जनाबाई महाविद्यालयात केले होते यावेळी उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी तथा सहाय्यक पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा तहसीलदार गोविंद येरमे, नायब तहसीलदार सुनील कांबळे, महावितरण इंजिनियर नितेश भसारकर ,नगर परीषद मुख्य अधिकारी वसुधा फड, वसुली प्रमुख सुरेश मणियार, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील माने, सहाय्यक पोलीस निरीक्षक ईजळकर देवकर,डि.बी.चे देशपांडे, पैठणे,पत्रकार तथा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष दगडुशेट सोमाणी, ग्रामिण पत्रकार संघाचे अध्यक्ष रमेश कातकडे,मोसिन खान,भागवत जलाले, नगरसेवक मुस्तफा भाई, उस्मान नेते, बाळासाहेब जंगले, संपादक राजेश कांबळे, महमूद शेख, तुषार उपाध्ये, प्रमोद साळवे, आदी उपस्थित होते.उपविभागीय पोलीस अधिकारी तथा सहाय्यक पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा यांनी मार्गदर्शक सुचना केल्या तर सुधीर पाटील यांनी गणेश मंडळाने शेतकरी बाबत देखावे गणेश मंडळाने करावेत अशा सुचना देण्यात आल्या शांतता समितीची बैठक शांततेत पार पडली होती.केवळ लोकप्रतिनिधी बैठकीस हजर नसल्याचे शल्य निर्माण झाल्याने त्यांच्या हट्टापोटी पोलिस व तहसिल प्रशासनाने आज सोमवार रोजी दुसऱ्यांदा शांतता बैठकीचे आयोजन पुन्हा त्याच जागी करण्यात आले.यावेळी पोलिस प्रशासन काम निट करीत नसून वसुली(हप्ते) करीत आसल्यामुळेच दारू गुटका मटका सर्व अवैद्य धंदे जोमात सुरू असल्याचे ( वक्तव्य) आरोप लोकप्रतिनिधी यांनी आपल्या भाषणातुन करताच उपविभागीय पोलिस अधिकारी साह्ययक पोलिस अधिक्षक श्रेणिक लोढा आक्रमक होत लोकप्रतिनिधी यांना जाब विचारत वसुली(हप्ते गोळा ) करणाऱ्यांचे पुरावे द्या मी कार्यवाही करतो म्हणत लोकप्रतिनिधी व पोलिस अधिकाऱ्यांत चांगलीच खडाजंगी होताना शांतता समिती बैठकीस आलेल्यांची चांगलीच करमणूक होत होती वाद शांत झाल्यावरही पुन्हा पुन्हा खडाजंगी होत होती याप्रकारामुळे बैठक शांतता समितीची की खडाजंगीची अशीच चर्चा शहरात जोरदार रंगलेली होती या खडाजंगी मुळे आमदार पुन्हा वादग्रस्त चर्चेत आलेले आहेत.