जाहिरात
गडचिरोलीताज्या घडामोडी

जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हा वर्धापन दिन साजरा

जिल्हानिर्मिती आंदोलनात सहभागी कार्यकर्त्यांचा जिल्हाधिकारी मीना कडून सत्कार

Spread the love

गडचिरोली (दि,१ सप्टेंबर)
जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हाधिकारी संजय मीना यांच्या अध्यक्षतेखाली गडचिरोली जिल्ह्याचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. अण्णा हजारे विचार मंचचे जिल्हाप्रमुख बसंत सिंग बैस यांच्या हस्ते केक कापण्यात आला गडचिरोली जिल्हा निर्मितीमध्ये आनंदराव कांबळे ,अनुरथ निलेकार यांचा सिंहाचा वाटा असल्याने गडचिरोली जिल्हा वर्धापन दिनाचे दिवशी जिल्हाधिकारी संजय मीना यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

बसंतसिंग बैस यांनी जिल्हाधिकारी यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले .

गडचिरोली जिल्हा निर्मिती बाबत मनोहर हेपट, विलास निंबोरकर यांनी मार्गदर्शन केले. अध्यक्ष भाषणात जिल्हाधिकारी संजय मीना म्हणाले की, गडचिरोली जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील आहे. ग्रामीण भागातील आदिवासींचे, गैर आदिवासींचे राहणीमान, रस्ते, दळणवळण सुविधा,गौण खनिजापासून तसेच गौण उपजापासून फायदे इत्यादी बाबत योजनात्मक विकास कामे घेण्यात आलेली आहेत. वडसा ते गडचिरोली लोहमार्ग, १०० खाटाचे सर्व सोयी युक्त असलेले मेडिकल कॉलेज साठी जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. गडचिरोली जिल्ह्यात लोह खनिजावर तसेच गौण उपजावर आधारित कारखाना, लघुउद्योग, कारखाने निर्माण करून बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून बेकारी कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. शेतकऱ्याचे अनेक प्रश्न आहेत यावर्षीच्या पावसाळ्यात शेतकऱ्याचे पिकाचे नुकसान झाले त्याबाबत सर्वे कामाला सुरुवात करण्यात आली आहे असे सांगितले कार्यक्रमाचे वेळी अप्पर जिल्हाधिकारी निवासी जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, अधिकारी ,कर्मचारी तसेच अण्णा हजारे विचारमंच चे देवेंद्र ब्राह्मणवाडे ,तुलाराम नैताम, कोमेश कत्रोजवार, नरेंद्र पोवन वार व इतर कार्यकर्ते हजर होते .

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button