जाहिरात
आपला जिल्हा

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा

Spread the love

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि. २७ जुलै)

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण आरमोरी–गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील आरमोरी, गडचिरोली, कुरखेडा, कोरची व देसाईगंज (वडसा) या सर्व तालुक्यांमध्ये विविध समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले. सामाजिक बांधिलकी जपत आरोग्य, शिक्षण, पर्यावरण संवर्धन व रुग्णसेवा यांना प्राधान्य देत विविध विधायक उपक्रम राबविण्यात आले.

सदर कार्यक्रमांचे आयोजन संबंधित तालुकाप्रमुखांच्या पुढाकाराने तसेच नवनियुक्त सहसंपर्कप्रमुख डॉ. श्रीकांत बनसोड व जिल्हाप्रमुख पवन गेडाम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. या सर्व उपक्रमांना संपर्कप्रमुख महेश केदारी यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.

वाढदिवसानिमित्त विधानसभा क्षेत्रातील विविध ग्रामीण रुग्णालये तसेच जिल्हा सामान्य रुग्णालयांमध्ये भरती असलेल्या रुग्णांना फळे व बिस्किटांचे वाटप करण्यात आले. याशिवाय वृक्षारोपण, शालेय विद्यार्थ्यांना पुस्तके व वह्यांचे वाटप, सामाजिक जनजागृती तसेच विविध समाजोपयोगी उपक्रमांद्वारे पक्षप्रमुखांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. या सर्व कार्यक्रमांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

देसाईगंज (वडसा) येथे भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिर
!!
देसाईगंज (वडसा) येथे नवनियुक्त सहसंपर्कप्रमुख डॉ. श्रीकांत बनसोड यांच्या बनसोड मल्टीस्पेशालिटी ऑफ मल्टीपॅथी हॉस्पिटल येथे पक्षप्रमुखांच्या वाढदिवसानिमित्त मुळव्याध, भगंदर, फिशर आदी आजारांसाठी मोफत तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचा तालुक्यातील मोठ्या संख्येने पीडित रुग्णांनी लाभ घेतला.

या शिबिराचे उद्घाटन जिल्हाप्रमुख पवन गेडाम, तालुकाप्रमुख विलास ठाकरे व शहरप्रमुख विश्वास सहारे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. यावेळी जिल्हाप्रमुख पवन गेडाम यांनी उपस्थित रुग्णांची आस्थेने विचारपूस करून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. तसेच अशा प्रकारचे व्यापक जिल्हास्तरीय मोफत आरोग्य तपासणी शिबिर लवकरच आयोजित करण्यात येईल, अशी घोषणा त्यांनी केली.

शिबिरामध्ये रुग्णांची तपासणी स्वतः डॉ. श्रीकांत बनसोड तसेच मुळव्याध, भगंदर व गुदरोग तज्ज्ञ डॉ. मनोज बुद्धे (सर्जन) यांनी केली. शिबिराचा लाभ घेतलेल्या रुग्णांनी पक्षप्रमुख मा. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा देत शिवसैनिकांनी हाती घेतलेल्या समाजोपयोगी उपक्रमांचे मनापासून कौतुक केले.

आरमोरी येथे विविध समाजोपयोगी कार्यक्रम
!!
आरमोरी येथे आयोजित कार्यक्रमास माजी जिल्हा परिषद सदस्या सौ. वेणुताई धावगाये, महिला जिल्हा संघटिका सौ. हेमलता वाघाळे, लहानू पिल्लारे, काळबांडे तसेच ज्येष्ठ शिवसैनिक व माजी सरपंच श्री बुधाजी किरमे यांची विशेष उपस्थिती लाभली.

तसेच मातोश्री विद्यालय, पिसे वडधा येथे शालेय विद्यार्थ्यांच्या समवेत माजी जिल्हा परिषद सदस्या सौ. लक्ष्मी हरीश मने यांनी वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत पक्षप्रमुखांचा वाढदिवस साजरा केला.

गडचिरोली मुख्यालयात रुग्णसेवा
!!!
गडचिरोली मुख्यालयात शहरप्रमुख पप्पू शेख, विधानसभा संघटक नंदूभाऊ कुमरे, तालुकाप्रमुख धनराज कोमटे, उपजिल्हाप्रमुख (युवासेना) चेतन उरकुडे, तालुका प्रमुख (युवासेना) वैभव सातपुते, शहर प्रमुख (युवासेना) अतुल सोनाग्रे, उपशहर प्रमुख (युवासेना) सोहेल शेख, शहर संघटक (युवासेना)सतीश उरकुडे, विधानसभा समन्वयक आकाश शेख, उमेश शेख तसेच अन्य पदाधिकारी व शिवसैनिकांनी जिल्हा सामान्य रुग्णालयाला भेट देऊन रुग्णांना फळे व बिस्किटांचे वाटप केले. रुग्णांची व त्यांच्या नातेवाईकांची आस्थेने विचारपूस करून रुग्णालयातील सोयी-सुविधांची माहिती घेतली. रुग्णांना धीर देत “शिवसैनिक म्हणून आम्ही सदैव आपल्या पाठीशी आहोत” असे आश्वासन देण्यात आले. समाजसेवेचा हा उपक्रम राबवून गडचिरोली मुख्यालयात पक्षप्रमुखांचा वाढदिवस अत्यंत साधेपणाने व सेवाभावातून साजरा करण्यात आला.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button