जाहिरात
ताज्या घडामोडी

गोमातेला राष्ट्रमातेचा दर्जा द्या

शेकडो गोभक्तांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

Spread the love

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि. २७ जुलै)

गोमातेला राष्ट्रमातेचा दर्जा देण्यात यावा, देशभर गोहत्या बंदी कायद्याची कठोर अंमलबजावणी करावी तसेच गोसंवर्धनासाठी शासनाने विशेष योजना राबवाव्यात, या प्रमुख मागण्यांसाठी शेकडो गोभक्तांनी सोमवारी भव्य बाईक रॅली काढत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी सुमारे दहा हजार नागरिकांच्या सह्यांसह निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले.

स्थानिक इंदिरा गांधी चौक येथून बाईक रॅलीला प्रारंभ झाला. घोषणाबाजी करत शेकडो गोभक्त जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले. रॅलीत गोमातेच्या संरक्षणासाठी आणि संवर्धनासाठी विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यात आले.

जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात गोमातेला राष्ट्रमातेचा दर्जा देण्याची मागणी करण्यात आली. तसेच ज्या राज्यांमध्ये गोहत्या बंदी कायदा लागू नाही, त्या राज्यांमध्येही तातडीने कायदा लागू करावा, विद्यमान कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी आणि गोसंवर्धनासाठी विविध शासकीय योजना राबवाव्यात, अशा मागण्या करण्यात आल्या.

जिल्हाधिकाऱ्यांमार्फत हे निवेदन देशाचे राष्ट्रपती, राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांनाही पाठविण्यात आले. शासनाने या मागण्यांची गांभीर्याने दखल घेऊन त्वरित सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा यावेळी गोभक्तांनी व्यक्त केली.

या बाईक रॅलीचे प्रमुख आयोजक नंदी भगवान होते. रॅलीत शेकडो गोभक्तांचा उत्स्फूर्त सहभाग असून गोमातेप्रती असलेली श्रद्धा आणि एकजूट याचे दर्शन घडल्याचे यावेळी उपस्थितांनी सांगितले.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button