जाहिरात
गडचिरोलीराजकीय

वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष नेमणूकीचे निषेधार्थ पदाधिकाऱ्यांचा सामूहिक राजीनामा

Spread the love

गडचिरोली(दि.२९जून)
वंचित बहुजन आघाडी गडचिरोली जिल्हाध्यक्ष पदावर असतांना जनतेची कोट्यावधी रूपयाची आर्थिक लुबाडणुक करून जेलमधुन परत आलेले बाळु टेंभुर्णे यांची पुन्हा जिल्हाध्यक्ष पदावर नियुक्ती झाल्याच्या निषेधार्थ पक्षाचे जिल्हा सरचिटणीस केशव सामृतवार, जिल्हा प्रसिध्द प्रमुख विनोद आजबले यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिलेले आहेत.
आम्ही वंचित बहुजन आघाडीचे जेष्ठ पदाधिकारी असुन पक्षासाठी प्रामाणिकपणे काम करीत आहोत. इतरही अनेक कार्यकर्ते या पक्षासाठी तळमळीने कार्य करीत आहेत. परंतु या सर्वांना डावलून पक्षाने जनतेची फसवणुक करनाऱ्या एका व्यक्तीची जिल्हाध्यक्ष पदावर नियुक्ती केली हा प्रामाणिकपणा जनसेवेचे काम करणाऱ्या कार्यकर्त्याचा अवमान आहे.
वंचित बहुजन आघाडीत बहुजन समाजातील कार्यकर्त्याना सन्मान मिळेल या अपेक्षेने आम्ही या पक्षात काम करीत होतो. परंतु बहुजन समाजातील आमच्या सारख्या कार्यकर्त्याची पक्षात गरज नसून गोरगरीब लोकांची फसवणुक करणारे कार्यकर्ते वरिष्ठांना जवळचे व महत्वाचे वाटतात. ही बात दुर्देवी आहे. असे सामृतवार व आजबले यांनी सांगितले.
जनतेची आर्थिक फसवणूक केल्याबाबत वंचित बहुजन आघाडीने बाळू टेंभुर्णे यांना पदावरून निष्काषीत केले होते. परंतु इतर सक्षम कार्यकर्त्याना डावलून त्याच व्यक्तीची पुन्हा जिल्हाध्यक्षपदी नेमणूक करण्यात आल्याने कार्यकर्त्यात मोठया प्रमाणात नाराजी पसरली आहे. यामुळे पक्षाची प्रतिमा जनमानसात मलीन होत आहे. इतरही अनेक कार्यकर्ते पक्ष सोडण्याच्या तयारीत आहेत.जिल्हा सरचिटणीस केशव सामृतवार, जिल्हा प्रसिध्द प्रमुख विनोद आजबले यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button