गडचिरोली (दि,२९ जून)
संविधानाने प्रत्येक व्यक्तीला किंवा त्यांच्या समुदायांना उपासना करण्याचे अधिकार दिले आहेत. म्हणून आज कुणीही आपापल्या धर्मानुसार पुजा, अर्चा, प्रार्थना व विधी पार पाडू शकतो. संविधानाने अधिकाराबरोबरच काही कर्तव्याची जाणीवही करून दिलेली आहे. परंतु जो तो आपल्या अधिकाराची भाषा करतो पण जेव्हा कर्तव्य पार पाडण्याची वेळ येते तेव्हा त्यावर मात्र गळीगप होतो. सुरवातीला मुर्त्यांची संख्या कमी असायची, त्या मातीच्या असायच्या, आकार लहान असायचा. म्हणून कोणत्याही प्रकारच्या प्रदुषणा बाबतीत तक्रार नसायची. करमणूकीचे साधने नसल्याने उत्सवाच्या निमित्ताने कामावरून थकून भागून आलेल्या लोकांना या माध्यमातून आयोजित केलेल्या मनोरंजनात्मक कार्यक्रमातून थोडा विरंगुळा मिळायचा आणि प्रबोधन व्हायचे. काळाच्या ओघात मातीची जागा पिओपी, प्लास्टिक यांनी घेतल्यामुळे व मुर्त्यांच्याही संख्येत बरीच वाढ झाल्याने फार मोठ्या प्रमाणात गंभीर समस्या निर्माण होऊ लागल्या. कोर्टाला देखील यात हस्तक्षेप करावा लागून त्यांनी गणेशोत्सव आणि नवरात्रौत्सवात प्लास्टिक ऑफ पॅरिसच्या (पीओपी) गणेश व देवीच्या मूर्ती बनवण्यावर आणि त्या वापरण्यावर बंदी घालणारे कायदे पारीत केले. समाजातील काही स्वार्थी लोक व्यवसायाच्या नावाखाली या नव्या मार्गदर्शक तत्वांच्या वैधतेला आव्हान देणारी जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल केली तेव्हा ती याचिका उच्च न्यायालयाने जन हिताचा विचार करून फेटाळली.
(https://www.loksatta.com/mumbai/bombay-high-court-upholds-ban-on-use-of-pop-idols-during-festivals-mumbai-print-news-zws-70-2992763/[6/27, 18:47] ) सरकारने वरील आदेशाचे पालन करण्यासाठी आतापासुनच पीओपी पासुन बनविलेल्या मूर्ती ताब्यात घेतल्या पाहीजे. बनविणारे आहेत त्याच्यावर कारवाई केली पाहीजे. मूर्तीकार बांधवांनी सुद्धा या आदेशाचे पालन करण्यासाठी मातीच्याच मूर्ती बनवायला सुरवात करायला हवे. मंडळानी लहान आणि मातीच्याच मूर्तीचा आग्रह धरायला पाहिजे. धर्मशास्त्रात मोठ्या मूर्ती तसैच पीओपीच्या बनवा असे कुठेही सांगितले नाही. पर्यावरण वाचविणे काळाची गरज आहे. ज्यांना आपण पंच महाभूते म्हणतो त्यांचेच मोठ्या प्रमाणावर प्रदुषण होत आहे. ग्लोबल वार्मिंग वाढत आहे. निसर्गाच्या रचनेत मानवी हस्तक्षेपामुळे रूतुचक्रात मोठ्या प्रमाणात बदल होत आहेत आणि वसुंधरेचे आयुष्य धोक्यात येत आहे. मानवाचा हस्तक्षेप वगळता सृष्टीतील सर्व प्राणीमात्र नैसर्गिक रीत्या आयुष्य जगत असताना केवळ मानव जातीच्या आततायी कृत्यांमुळे सजीव सृष्टीतील ईतर घटकांनाही वाईट परिणाम भोगावे लागत आहेत म्हणून सर्वांना वेळीच सावध होऊनआपले श्रध्दा स्थानाचे मोठ्या उंचीवरुन कोणीही प्रदर्शन करु नये असे आवाहन महा अंनिस चे राज्य स्तरीय वैज्ञानिक जाणिवा शिक्षण प्रकल्प चे सहकार्यवाह श्री विलास निंबोरकर यांनी केले आहे.
