जाहिरात
आपला जिल्हा

कास्ट्राईब कर्मचारी महासंघाच्या गडचिरोली जिल्हाध्यक्षपदी ओमप्रकाश साखरे; कार्याध्यक्षपदी दिलीप मेश्राम

Spread the love

लोकशाही न्युज,गडचिरोली, (दि. १० ऑगस्ट २०२६) :

जागतिक आदिवासी दिनानिमित्त कास्ट्राईब कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्य, जिल्हा गडचिरोलीच्या जिल्हाध्यक्ष व कार्याध्यक्ष पदाच्या निवडीसाठी तसेच महापुरुषांना अभिवादन करण्याच्या उद्देशाने गडचिरोली येथील ग्रामसेवक भवन येथे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत लोकशाही पद्धतीने व खेळीमेळीच्या वातावरणात ओमप्रकाश साखरे यांची जिल्हाध्यक्षपदी, तर दिलीप मेश्राम यांची जिल्हा कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली.
कास्ट्राईब कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्याचे सरचिटणीस प्रभाकर सोनडवले यांची निवड प्रक्रियेसाठी निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेला राजकुमार घोडेस्वार राज्य उपाध्यक्ष, सिद्धार्थ गोवर्धन, राज्य उपाध्यक्ष वन कर्मचारी संघटना, रामनाथ खोब्रागडे ज्येष्ठ मार्गदर्शक, बंसोड साहेब विभागीय अध्यक्ष वन संघटना, रमेश घुटके, वरिष्ठ मार्गदर्शक, चक्रपाणी कन्नाके जिल्हाध्यक्ष शिक्षक संघटना गडचिरोली, सविता उराडे, उपाध्यक्षा, डॉ. दिवाकर नारनवरे, सरचिटणीस शिक्षक संघटना, डॉ. प्रभाकर साखरे कोषाध्यक्ष,उईके सर अध्यक्ष नगर परिषद शिक्षक संघटना, देवेंद्र डोहने, वरिष्ठ उपाध्यक्ष तसेच देवानंद बोरकर, वरिष्ठ मार्गदर्शक,यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी संघटनेच्या कार्याचा आढावा घेत पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. कास्ट्राईब कर्मचारी महासंघ ही विविध विभागांतील कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधित्व करणारी मध्यवर्ती संघटना असून, महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांतील सुमारे ३२ कर्मचारी संघटना या संघटनेशी संलग्न आहेत. कर्मचाऱ्यांच्या विविध अडीअडचणी, प्रश्न व मागण्या शासन दरबारी तसेच संबंधित अधिकाऱ्यांकडे मांडून त्या सोडविण्यासाठी संघटना सातत्याने प्रयत्नशील आहे. कर्मचारी प्रश्न राज्यस्तरावर तसेच मंत्रालयीन पातळीवर प्रभावीपणे मांडण्याचे कामही संघटनेच्या माध्यमातून केले जाते.
कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे कार्य केवळ कर्मचारी हितापुरते मर्यादित नसून, समाजाचेही आपल्यावर ऋण आहे आणि ते फेडण्याच्या सामाजिक बांधिलकीतून समाजहितासाठी कार्य करण्याचा संघटनेचा प्रयत्न आहे, असे यावेळी मान्यवरांनी सांगितले.
नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष ओमप्रकाश साखरे आणि जिल्हा कार्याध्यक्ष दिलीप मेश्राम यांनी संघटनेने सोपविलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्याची ग्वाही दिली. जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व कर्मचारी बांधवांना सोबत घेऊन संघटना अधिक मजबूत करण्यासाठी तसेच कर्मचारी व समाजाच्या विविध प्रश्नांसाठी सातत्याने प्रयत्न करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
या सभेला मोरेश्वर भैसारे, तालुकाध्यक्ष चामोर्शी, चंदू रामटेके, उपाध्यक्ष, सुनील उंदीरवाडे, चुडामन उंदीरवाडे, पटले सर, क्रांती साखरे, रत्नदीप साखरे, प्रमोद उंदीरवाडे, सोहन माहोरकर, दादाजी शेडमाके, वंदना रामटेके, नीता खेडेकर, अर्चना हाताडकर यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्या सहकार्यामुळे निवड सभा उत्साहपूर्ण व यशस्वी वातावरणात पार पडली. कार्यक्रमाचे उत्कृष्ट संचलन डॉ प्रभाकर साखरे यांनी तर आभार देवेद्र डोहणे यांनी केले.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button