ए सी बी च्या जाळ्यात अडकला लिपीक ५००० रुपये लाच घेणे पडले महागात
कुरखेडा (दि,२८ जून)
सिसी रोड व मंदिराचे सौंदर्यीकरण कामाचे थर्ड पार्टीचे बिल मंजुर करुन काढुन देण्याचे कामाकरीता आरोपी श्री. देवीदास मुखरु देशमुख, वय ४५ वर्षे, लिपीक, नगरपंचायत, कुरखेडा यांनी ५,४०० रूपये लाच रक्कमेची मागणी केली पण मात्र तक्रारदार यांना कोणतीही रक्कम देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत विभाग कार्यालयात तक्रार दाखल केली तक्रारीची शहानिशा करून सापळा रचला असता २८ जून रोजी कुरखेडा नगरपंचायत कार्यालय येथे तडजोडीअंती ५,००० रुपये स्विकारतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले वर नमुद कलमान्वये कार्यवाही केली .या प्रकरणी आरोपीवर पोलीस स्टेशन कुरखेडा येथे कलम ७ भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पोनि श्री. श्रीधर भोसले, स.फौ. प्रमोद ढोरे, पोहवा नथ्थु धोटे, पो. ना राजेश पदमगिरवार, पो. ना. श्रीनिवास संगोजी, पोशि संदीप उडाण, चापोहवा तुळशिराम नवघरे सर्व लाचलुचपत प्रतिबंधक विभाग गडचिरोली यांनी केली .
