गडचिरोली : सुनिल आंबोरकर बनले “डीवायएसपी’

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि. २ जून)
गडचिरोली जिल्ह्याचे मूळ रहिवासी सुनील जयवंतराव आंबोरकर यांची सीआरपीएफ मध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी “डीवायएसपी” पदावर पदोन्नती झाली आहे.सध्या त्यांची नियुक्ती भुवनेश्वर येथे करण्यात आलेली आहे.
सुनील आंबोरकर हे सन १९८८ मध्ये केंद्रीय पोलीस निरीक्षक या पदावर कार्यरत असताना. त्यांच्या प्रमोशनचे आदेश महामय राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्म यांच्या साक्षरीने गृहमंत्रालय भारत सरकार नवी दिल्ली यांच्या कार्यालयाद्वारे जारी करण्यात आलेले आहे.
मूळ शिक्षण गडचिरोलीतच
!!
सुनील आंबोरकर यांनी आपले चौथी पर्यंत शिक्षण बेसिक शाळेत, दहावी पर्यंतचे शिक्षण वसंत विद्यालय. व पदवीपर्यंतचे शिक्षण शिवाजी महाविद्यालय गडचिरोली येथे घेतलेले आहे.
वर्ष १९८८ येथे केंद्रीय रिझर्व पोलीस दलात भरती होऊन व वेळोवेळी परीक्षा देऊन प्रथम सहाय्यक उपनिरीक्षक,२००५ मध्ये उपनिरीक्षक,२०१६ मध्ये पोलीस निरीक्षक या पदावर पदोन्नती सुधा घेतलेली आहे.
पोलीस निरीक्षक या पदावर कार्यरत असताना त्यांची डीवायएसपी (सहाय्यक कमांडर ) या पदावर प्रमोशन झाल्यानंतर पोलीस दलाचे जन्मस्थान असलेले जिल्हा मध्यप्रदेश येथील ट्रेनिंग कॉलेजमध्ये प्रशिक्षक म्हणून पदस्थ झालेले आहेत.
अनेक राज्यात केली सेवा
!!
१९८८ पासून तर आजवर भारताच्या विभिन्न राज्यातील जम्मू,काश्मीर, आसाम,छत्तीसगड,केरळ,तामिळनाडू, पांडेचरी,आंध्रप्रदेश, कर्नाटक इत्यादी राज्यात सेवेत कार्यरत असताना त्यांच्या उत्कृष्ट सेवेबद्दल अनेक पदके देऊन त्यांना गौरवण्यात सुद्धा आले.
गडचिरोली येथील तेली समाजातील शेतकरी कुटुंबात जन्मलेले केंद्रीय दलातील सेवेत राहून आज वर्ग १ अधिकारी या पदावर पोहोचणारे पहिले अधिकारी म्हणावे लागेल.त्यांचे बालपण सामान्य गरीब शेतकरी कुटुंबात गेले. त्यांना लहानपणा पासून सैन्यात भरती होऊन देशसेवा करण्याची आवड होती. सैन्यातील कठीण प्रशिक्षण व ट्रेनिंग घेऊन स्वतः एक चांगले प्रशिक्षक सुद्धा झालेले आहेत.
मनमिळाव स्वभावाचे व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाणारे व त्यांच्या झालेल्या प्रमोशन बद्दल संपूर्ण तेली समाज मित्रपरिवार व नातेसंबंधात त्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
गडचिरोली सारख्या दुर्गम व मागास जिल्ह्यातून पुढे येत सुनील आंबोरकर यांनी आपल्या कर्तुत्वाच्या जोरावर हे उल्लेखनीय कामगिरी साध्य केली आहे त्याच्या या यशामुळे जिल्ह्यातील युवकांना नवी प्रेरणा मिळाली असून कठोर परिश्रम जिद्द आणि चिकाटीच्या बळावर उच्च पदापर्यंत पोहोचता येते हे त्यांनी सिद्ध करून दाखविले आहे.
