आपला जिल्हा
गडचिरोली : दिड किलोचा ‘कलेक्टर’

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि. २७ मे)
कृषी विज्ञान केंद्र, गडचिरोली येथे सुरू असलेल्या आंबा महोत्सवात आरमोरी येथील शेतकरी श्री. प्रमोद कांबळे यांनी तब्बल १ किलो ४०० ग्रॅम व १ किलो ३०० ग्रॅम वजनाचे ‘कलेक्टर’ जातीचे आंबे प्रदर्शित करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
कृषी महाविद्यालयात रंगलेल्या आंबा महोत्सवात या कलेक्टर आंब्याला बघण्याकरिता अनेक नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती.
जाहिरात
