कुरखेडा : सती नदीत बुडून ३ चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू; चौथ्या मुलाचा जीव वाचला

लोकशाही न्युज,गडचिरोली/ कुरखेडा (दि.१ ऑगस्ट २०२६)
कुरखेडा तालुक्यातील मौजा खेडगाव येथे आज (दि.१) दुपारी सुमारे १२:३० वाजताच्या सुमारास सती नदीत आंघोळीसाठी गेलेल्या चार अल्पवयीन मुलांपैकी तिघांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.मृतक झालेले अल्पवयीन मुलं हे खेडगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षण घेत होते.
प्राथमिक माहितीनुसार, सती नदीत आंघोळीसाठी गेलेल्या चार मुलांपैकी लक्ष्मण सुन्हेर दुधकवर (वय ६ वर्षे), कुनाल नरेश दुधकवर (वय ५ वर्षे) आणि कोहित युवराज सराटे (वय ११ वर्षे) यांचा बुडून मृत्यू झाला. चौथ्या मुलाने प्रसंगावधान राखून स्थानिक नागरिक व मच्छीमार यांना माहिती दिली.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक यंत्रणांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्य, पंचनामा व इतर आवश्यक कायदेशीर कार्यवाही सुरू केली. प्राथमिक तपासानुसार तिघांचा मृत्यू बुडाल्यामुळे झाल्याचे तहसीलदार, कुरखेडा यांनी कळविले आहे.
