देऊळगाव घुबे येथे चोरट्यांचा धुमाकूळ
एकाच रात्री तीन घरे फोडून लाखोंचा ऐवज लंपास तर दोन बैल जोडी सह गाय व वासरू केले पसार
लोकशाही न्यूज मराठी पोर्टल
चिखली | मेघा जाधव
मो.9529186383
देऊळगाव घुबे ता.चिखली :- स्थानिक देऊळगाव घुबे येथे चार ते पाच दिवसाआड चोरट्यांचा धुमाकूळ हा सतत सुरू असुन गोठ्यातील जनावरानंतर चोरट्यांची नजर आता बंद असलेल्या घरावर पडली असुन समाधान नारायण घुबे व रमेश कचरु चवरे यांच्या बैलजोडी सह गाय आणि वासरू चोरल्या नंतर चोरटे आता गावातील बंद असलेल्या घरांना लक्ष करीत असल्याचा प्रकार देऊळगाव येथे घडत असुन ऐन पेरणीच्या दिवसांमध्ये अडचणी वर मात करीत शेतकरी आपल्या शेतीसाठी खते व बियाणे यांची जुळवाजुळव करीत असतांनाच चोरट्यांनी एकाच रात्री तीन बंद घरांचे कुलुप कटरच्या साह्याने कापुन लाखो रुपयांचा ऐवज लंपास केल्याने सदर शेतकरी आणखीनच संकटात सापडले आहेत ही घटना ६ जुनच्या सकाळी उघडकीस आली.
सदर घटनेची माहिती स्थानिक पोलीस पाटील हरीभाऊ जाधव यांनी पोलिस स्टेशन अंढेरा यांना देताच तेथील पोलीस उपनिरीक्षक मनोज वासाडे हे तात्काळ आपल्या ताफ्यासह घटना स्थळी दाखल होऊन पाहणी केली तर त्या मध्ये १)वासुदेव सुखदेव चेके २) सतीष अशोक घुबे ३) आत्माराम लक्ष्मण खेडेकर हे सर्व उन्हाळ्याचे दिवस असल्याने घराच्या छतावर झोपण्यासाठी गेलेले असतांना चोरटयांनी सदर घराचे कुलूप हे कटर मशीन घ्या साह्याने कापुन घरामध्ये शिरुन घरातील पेट्या व कपाट तोंडुन त्यातील सामान अस्ताव्यस्त करून आत्माराम लक्ष्मण खेडेकर यांच्या कपाटातील नगदी रोख अकरा हजार रुपये व कपाटाच्या डावर मध्ये ठेवलेले दागिने एक गहु पोत,एक नेकलेस,झुंबर जोड व लहान मुलांचे दागीने असा लाखों रुपयांचा ऐवज लंपास केल्याचे उघड झाले आहे.सदर प्रकरणाची तक्रार रमेश कचरु चवरे यांनी अंढेरा पोलिस स्टेशन मध्ये दाखल केली असून दाखल अधिकारी अनिल खारडे ब.न.२४२४यांनीअ.प.न.१७५/२२कलम३७९भांदवी नुसार अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास अधिकारी म्हणून बीट जमादार कैलास उगले ब.न.७१४ हे करीत आहे.सदर घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
