कृषिदुतांनी दिले बळीराजाला माती परिक्षणाचे धडे.
लोकशाही न्युज मराठी पोर्टल..
चिखली | मेघा जाधव
मो.9529186383..
दि. 7 जून २०२२
शेतकरी बांधवाना माती परीक्षण का करावे माती परीक्षणचे होणारे लाभ माती परीक्षणासाठी नमुना कशाप्रकारे घ्यावा माती परीक्षण घेताणा कोणती काळजी घ्यावी यासबंधी माहिती येथील स्थानिक समर्थ कृषि महाविद्यालयाच्या कृषीदूतांनी ग्रामीण कृषि कार्यक्रमांतर्गत ग्राम कुंभारी येथील शेतकर्यांना माती परीक्षणाविषयी मार्गदर्शन केले. माती परीक्षण म्हणजे काय, ती कशी करावी,माती परीक्षणाचे लाभ काय याबद्दल प्रात्यक्षिकाद्वारे माहिती दिली. पिकाच्या अन्नद्रव्यासाठी व त्याच्या पुरवठा करण्यासाठी माती परीक्षण किती लाभदायक असल्याचे सांगितले. माती परीक्षण करुन अन्नद्रव्य पुरवल्यास उत्पन्न वाढवण्यास मदत मिळते, माती परीक्षण केल्यास रासायनिक खताचा अतिरेक होत नाही व मातीचे प्रदूषण टाळता येते. यावेळी महाविद्यलयाचे प्राचार्य नितीन मेहेत्रे, रावे समन्वयक प्रा. मोहजीतसिंग राजपूत, तसेच मृदाशास्त्र विभागप्रमुख प्रा. विलास सातपुते यांनी माती परीक्षणाविषयी सविस्तर माहिती दिली. जमिनीच्या प्रकारानुसार शेताचे विभाग हे विभाग पाडतांना जमिनीचा रंग, खोली, पोत, उंच सखलपणा,आदी बाबत शेतकर्यांना मार्गदर्शन करण्यात आले. कुंभारी गावातील गावकरी तसेच समर्थ कृषी महाविद्यालयाचे विद्यार्थी विनय बंड, दीपक भोगे, नीरज बोरकर, रोहन बंगाळे, मयूर अंजंकर, पवन अधव, सुयोग बंगाळे, कैलास बरांडे हे कृषिदूत उपस्थित होते .