जाहिरात
चिखली

जगतगुरु संत तुकाराम महाराज गाथा लेखन सृजन उपक्रम : हभप सौ.उर्मिलाताई कदम

Spread the love

लोकशाही न्युज,(दि.२९ जानेवारी) चिखली प्रतिनिधी/ मेघा जाधव

“अंखडित आहे ज्यांचा वैराग्य- विचार, तोच खरा जगद्‌गुरु तुकाराम” संत तुकाराम महाराज हे केवळ वारकरी संप्रदायाचे कळस नसून ते जगाला व्यवहार, आणि आध्यात्म यांची सांगड घालून देणारे महान तत्वज्ञ आहेत. त्यांच्या ‘गाथेत ‘ आयुष्यातील प्रत्येक संकटावर उपाय आणि प्रगतीचा मार्ग दडला आहे.

आजच्या तंत्राज्ञानाच्या युगात १२ ते १६ वयोगटातील मुलांच्या हाताला लेखनाची सवय राहावी आणि त्यांच्या मनावर नैतिक मूल्यांचे संस्कार व्हावेत, या हेतूने आपण हा गाथा लेखन सृजन उपक्रम सुरु करत आहोत. या माध्यमातून विद्यार्थी केवळ अक्षरे गिरवणार नाहीत, तर तुकोबांच्या ‘अक्षय’ विचारांना स्वतःच्या आयुष्यात उतरवतील म्हणून हा उपक्रम.राष्ट्रमाता जिजाऊ इंग्लिश स्कुल मध्ये
राबवण्यात येत आहे.

शाळेचे अध्यक्ष पंडीतराव देशमुख (चिखली शहराचे नगराध्यक्ष) तथा शाळेच्या प्राध्यापक श्रीमती दिपा वाघ मॅडम,आणि संपुर्ण शिक्षकांच्या सहमत‌ाने हा उपक्रम शाळेमध्ये राबवण्यात येत आहे.

उपक्रमाचा फायदा
: मुलांचे हस्ताक्षर सुधारेल .
: शुद्धलेखन आणि व्याकरणाची गोडी लागेल,
: तुकोबांचे पुरोगामी आणि व्यावहारिक विचार त्यांच्या मनावर बिंबवले जातील.
: संत तुकाराम महाराजांचा आशीर्वाद सदैव त्यांच्या पाठीशी राहील.
: पर्यावरण रक्षण :- वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे – निसर्ग आणि मानवाचे नाते यावर आधारित अभंग या मध्ये आहेत.
:जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले माणुसकी आणि मदतीची भावना शिकवणार अंभग या मध्ये आहेत
: असाध्य ते साध्य करिता सायास, अभ्यासाचे आणि कष्टाचे महत्व सांगणारे अभंग या मध्ये आहेत. म्हणून हा उपक्रम मुलांच्या जीवनात जणू सुवर्णसंधीच बनून आला आहे. ह.भ.प. सौ उर्मिलाताई रमेश कदम यांच्या सुंदर सकल्पनेतुन हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे.

जगद्‌गुरु संत तुकाराम महाराज गाथा लेखन सृजन उपक्रम हा अंत्यत प्रेरणादायी आणि आध्यात्मिक उपक्रम आहे. ४,५०० पेक्षा जास्त अंभगाचा संग्रह असलेल्या संत तुकाराम गाथेचा अभ्यास, प्रसार आणि जतन करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. अशा या संत तुकाराम महाराज गाथा लेखन सृजन उपक्रमामध्ये आपणही नक्की सहभागी व्हावे. राम कृष्ण हरी

हभप सौ. उर्मिलाताई रमेश कदम

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button