प्रभाग क्रं. ७ मधील निकृष्ट कामाला नगरसेविका मेघा वरघंटीवार यांनी लावला ब्रेक
लोकशाही न्युज, गडचिरोली (दि. ३० जानेवारी)
गडचिरोली नगर परिषद अंतर्गत येणाऱ्या प्रभाग क्र. ७ मध्ये महिला व बाल रुग्णालय च्या नवीन इमारती समोरील रस्ता कंत्राटदाराने आपल्या मर्जीने सुरुवात केली होती. नगरसेविका मेघा वरगंटीवार यांनी सदर रस्त्याच्या कामावर जाऊन चौकशी केली असता त्या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचे निष्पन्न झाले.

सदर सुरू असलेल्या कामाबाबत नगराध्यक्ष प्रणोती निंबोरकर यांना माहिती देण्यात आली. त्यांचे यजमान स्वीकृत सदस्य सागर निंबोरकर हे त्या रस्त्याच्या कामावर आले असता त्यांनी त्या कामाला तात्काळ ब्रेक लावून काम थांबवण्याची सूचना केली.सदर कामाचे इंजिनियर यांना कामावर बोलावून काम दर्जाचे व्हावे अशी तंबी देण्यात आली आहे.
सदर निकृष्ट दर्जाचे बांधकाम थांबले असुन त्याप्रसंगी नगरसेविका मेघा वरघंटीवार, मोहन वरघंटीवार, काँग्रेसचे स्वीकृत सदस्य नंदू कायरकर, रजनीकांत मोटघरे हे हजर होते.
नगरसेविका मेघा वरघंटीवार यांच्या हस्तक्षेपामुळे प्रभाग क्रमांक ७ मध्ये चांगले काम होतील असा आशावाद प्रभागातील नागरिकाकडून व्यक्त केला आहे.
