
लोकशाही न्युज, गडचिरोली (दि.३० जानेवारी)
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातात निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला आहे. राज्य शासनाने या घटनेचे गांभीर्य ओळखून तीन दिवसांचा अधिकृत शासकीय दुखवटा जाहीर केला असून सर्व सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्याचे आदेश दिले आहेत.
मात्र, गडचिरोली नगरपालिकेत या दुखवट्याचे भान हरपल्याचे चित्र पाहायला मिळाले.अवघ्या राज्यावर शोककळा पसरलेली असताना नगरपालिका सभापती अनिल कुनघाडकर यांनी आज आपल्या बांधकाम सभापतीपदाचा पदग्रहण सोहळा पार पाडला.
सदर पदग्रहण सोहळ्याचे निमंत्रण भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस, व काँग्रेस या पक्षाला देण्यात आले होते. पण बहुजन वंचित आघाडीचे बाळू टेंभुर्णे यांना या पदग्रहण सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आले नव्हते.
बांधकाम सभापतीच्या कक्षात झालेल्या पदग्रहण सोहळ्याला बाळू टेंभुर्णे यांनी विरोध दर्शविलेला आहे.तीव्र निषेध केला आहे.
