जाहिरात
Uncategorized

शेतीच्या वादातून पारवे कुटुंबाला मारहाण ,संरक्षणाची मागणी

दलित नेत्यांची परिवाराला भेट

Spread the love

चिखली प्रतिनिधी
लक्ष्मी गिऱ्हे
बुलडाणा जिल्ह्यातील देऊळघाट येथे शेतीच्या वादातून पारवे कुटुंबातील सर्व सदस्यांना 8 ते 10 गुंडाकडून बेदम मारहाण झाली , जिल्हा सामान्य रुग्णालयात दोन महिला व एक वृद्ध उपचार घेत आहे, रामराव पारवे हे सीआरपीएफ मध्ये कार्यरत होते सेवानिवृत्तीनंतर देऊळघाट येथील शेती वहीतीसाठी करीत असताना देऊळघाट येथील कलंदर खान यांनी शेती माझी असल्याचा दावा करीत पारवे कुटुंबावर अचानक जीवघेणा हल्ला करण्यात आला …
या हल्ल्यात वृद्ध रामराव पारवे यांना जबरदस्त मार लागल्याने पाठीवर व पायावर वळ उमटले असून गंभीर आहेत तसेच महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत ओढून मारहाण केल्याने त्यांच्यावर सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहे .
साम टीव्ही वर बातमी प्रसारित होताच जिल्ह्यातील सर्व दलित नेत्यांनी रुग्णालयात पीडितांची भेट घेतली.. तसेच जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन देऊन, आरोपींवर 307 व 395 गुन्हे दाखल करून आरोपीना अटक करा व भयभीत झालेल्या कुटुंबाला संरक्षण द्या अशी मागणी भुमी मुक्तीचे भाई प्रदिप आंभोरे, रीपाई आठवले गटाचे जिल्हा अध्यक्ष नरहरी गवई, संम्राट संघटनेचे आशिषबाबा खरात, राष्टवादिचे राजेश गवई, भिमशक्ती संघटनेचे जिल्हा अध्यक्ष प्रतीक जाधव यांच्यासह पत्रकार सामटीव्हिचे संजय जाधव, लाॅर्डबुध्दाचे दिपक मोरे यांच्यासह दलितांच्या विविध संघटनांनी केली आहे.
जर 3 दिवसात कारवाई झाली नाही तर रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल असा इशारा यावेळी देण्यात आला आहे .

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button