भूमी मुक्ती मोर्चाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन
चिखली प्रतिनिधी,मेघा जाधव
बुलढाणा :— बुलढाणा जिल्ह्यातील तथा महाराष्ट्र राज्यातील आदिवासी भुमीहीन लोकांना तात्काळ जमिनीचे कायम पट्टे मिळाले पाहिजे या प्रमुख मागणीसाठी ३/६/२०२२ ला एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले आहे . राज्यशासनाच्या जमिन महसूल व प्रलंबित पट्टेबाबत शासन निर्णय २०११ चा रद्द करूण आदिवासी व वननिवासी यांना जमिनीचे वाटप झाले पाहीजे या प्रमुख मागणीसाठी मा. जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मा.मुखंमत्री ,मा. उपमुख्यमंत्री . महसूलमंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई यांना निवेदन देण्यात आले आहे .सदर निवेदनात पुढील मागण्या करण्यात आल्या राज्यातील १९९० पूर्विचे अतिक्रमिताना सर्वेच्यनायालया निर्णयाप्रमाणे तांत्रिक कारणांचा शोध घेऊन जमिन कायम पटल्यावर देण्यात यावी …२) राज्यातिल जिल्हा उपविभाग वनहंक्क समीतीकडे प्रलंबित दावेदाराना तात्काळ पूर्वमशागत व पेरणीचे अणुमती देउन वनविभागात प्रलंबित याद्या करूण अडवणूक न करण्याचे आदेश द्यावेत .अशा एक ना अनेक मागण्यांचे निवेदन संघटनेचे अध्यक्ष भाई प्रदिप अंभोरे .तसेच भाई बाबुराव सरदार व जिल्यातिल तोलामोलाचे सर्वाच कार्यकर्ते हजर होते .
