जाहिरात
Uncategorized

गडचिरोली विधानसभा क्षेत्राच्या विकासासाठी निधी कमी पडु देणार नाही,आमदार डॉ. देवराव होळी

Spread the love

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि,६ सप्टेंबर)

आमदार डॉ. देवराव होळी यांच्या प्रयत्नातून गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील विविध गावांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विकास सुरू असून या क्षेत्राच्या विकासासाठी आपण कोणत्याही परिस्थितीत निधी कमी पडू देणार नाही असे प्रतिपादन गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. देवराव होळी यांनी कुनघाडा माल व ठाकरी येथील विविध विकास कामांच्या भूमिपूजन व लोकार्पण प्रसंगी केले.

यावेळी कुणघाडा माल येथील पोलीस भरतीत निवड झालेल्या युवकांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख राकेश बेलसरे, धर्मप्रकाश कुकुडकर, कुणघाडा माल सरपंच माया कन्नाके , उपसरपंच पौर्णिमा गोडगेलवार ,पोलीस पाटील मंदा तलांडे यांचे सह स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button