जाहिरात
चिखलीताज्या घडामोडी

विधवा वहिनी सोबत लग्न करून दिराने दिला आधार

Spread the love

चिखली प्रतिनिधी मेघा जाधव
चिखली तालुक्यातील डोंगरशेवली येथील कृष्णा खेडवनकर या तरुणाने आपल्या विधवा वहिनी सोबत लग्न करून समाजा समोर आदर्श निर्माण केला आहे.

स्व. गणेश खेडवनकर यांचे काही वर्षापूर्वी मळणी यंत्रामध्ये जाऊन मुत्यु झाला होता, त्यांच्या पच्यात त्यांना एक मुलगा व एक मुलगी असे दोन अपत्य आहेत, त्या दोन्ही मुलांची जबाबदारी ही त्यांच्या विधवा पत्नीवर आली होती, त्यात त्यांची घरची परिस्थिती हालाकीची असल्याने मुलांचा सांभाळ करने कठीण झाले होते. त्यामुळे गावकऱ्यांनी त्यांना त्यावेळी आर्थिक मदत देखील केली होती.

परंतु कमी वयात नवरा गेल्याने आता समोर काय? हा प्रश्न सर्वांन समोर उभा होता, त्यात कृष्णा खेडवनकर या तरुणाने समोर येऊन आपल्या विधवा वहिनी सोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्याच्या या निर्णयाचे गावकऱ्यांनी स्वागत करून त्यांचे लग्न सोमनाथ महाराज संस्थान डोंगरशेवली येथे लावून दिले.

खरोखरच कृष्णा खेडवनकर या तरुणाने समाज समोर आदर्श निर्माण करून दीला आहे. आपल्या विधवा वहिनी सोबत दोन्ही मुलांची संपूर्ण जबाबदारी स्वीकारुन त्यांना आधार देण्याचे काम या तरुणाने केले आहे.
बाकी तरुणांनी देखील कृष्णा या तरुणाचा आदर्श घेतला पाहिजे.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button