उमेश गोलेपल्लीवार
लोकशाही न्यूज प्रतिनिधी
सावली तालुक्यातील सामदा बुज येथील हिराचंद रामटेके यांच्या घरी सकाळी ८ वाजेच्या सुमारास गॅस सिलेंडरच्या भडका उडल्याने संपूर्ण घरच जळून खाक झाले. रामटेके यांचे घर कवेलू व लाकडी फाट्यांचे असल्यामुळे भडका उडून संपूर्ण घराला आग लागली. क्षणार्धात आगीने रुद्र रुप धारण केले. कुटुंबीयांनी आरडाओरड करताच नागरिकांनी धाव घेतली आणि आग विझविण्यात यश मिळविले. मात्र, तोपर्यंत मोठे नुकसान झाले होते.
जाहिरात
