उमेश गोलेपल्लीवार
लोकशाही न्यूज प्रतिनिधी
मुल तालुक्यातील निसर्गरम्य सोमनाथच्या पायथ्याशी असलेल्या मौजा मारोडा या गावाचा रहिवाशी गजानन गुरनूले वय ५० वर्षे नेहमीप्रमाणे गावाजवळच्या शेतात बैल चारावयास गेला होता. नेहमी प्रमाणे रोजच्या संध्याकाळच्या वेळीस गावात बैल आले पण बैल राखणारा गुराखी गजानन गुरनुले परत न आल्याने गावात शोधाशोध घेण्यास सुरुवात केली. परंतु गजानन दिसून आला नाही.
मग जिथे तो बैल चारावायला गेला त्या शेतात रात्रीच्या ८.३०
च्या दरम्यान जाऊन बघितले असता त्याची टोपी तर थोड्या
अंतरावर त्याचा धोतर
सापडला.त्याच दिशेनं
शोधत सोमनाथ डोंगराच्या पायथ्याशी डोंगरदेवीच्या जवळ
गजाननचे वाघाने खाल्लेले मृत शरीर सापडले. याबाबतची
माहिती वन विभागाला तसेच पोलीसाना माहिती देण्यात आली.
असता वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी दाखल होत तपासणी व पंचनामा करण्यात आला.
याप्रसंगी मारोडा येथील ग्राम पंचायत सरपंच भिकारूजी शेंडे, वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी नायगमकर, क्षेत्र सहायक पाकेवार, वनरक्षक उईके व काही ग्रामस्थ हजर होते. पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय मुल येथे नेण्यात आला. मृतक गजानन गुरनुले यांच्या नातेवाईकांना वनविभागाच्या वतीने तात्काळ २५ हजार रुपयांची मदत देण्यात आली. पुढील तपास वनविभागाच्या सहकार्याने मुल पोलीस करीत आहे. यापूर्वीही मारोडा गावाच्या शेतशिवारात वाघाने हल्ला करून ठार केल्याच्या तीन चार घटना झाल्याने मारोडा व कोसंबी परिसरात वाघाचे वावर वाढलं आहे हे मात्र खरे. मृतक गजानन गुरनुले याला यापूर्वी सुद्धा २०२१ च्या उन्हाळ्याच्या काळात त्याच्यावर वाघाचा हल्ला झाला होता. मात्र त्या हल्यात तो जखमी झाला आणि प्राण वाचले होते, मात्र काल दि. ३०/४/२०२३ ला दुपारच्या वेळेस त्याच्यावर झालेल्या वाघाच्या हल्यात गजाननचा मृत्यू झाला. शेवटी एकदा वाघाच्या तावडीतून सुटलेल्या गजाननचा अखेर वाघाणेच बळी घेतला. त्यामुळे मारोडा गावाच्या परिसरात पुन्हा एकदा वाघाच्या दहशतीमुळे भीतीच वातावरण पसरले आहे.
जाहिरात
