जाहिरात
चिखलीबुलढाणा

इफ्तार पार्टीच्या आयोजनाने सामाजिक सलोखा निर्माण होतो :गजानन वायाळ

Spread the love

जिल्हा प्रतिनिधी
संदीप म्हस्के
चिखली :- तालुक्यातील भरोसा येथे आयोजित इफ्तार पार्टी मध्ये बोलत असतांना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गजानन वायाळ म्हणाले की विविध जाती धर्माचे लोक एकोप्याने गुण्यागोविंदाने नांदण्याची महाराष्ट्राची परंपरा आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातीच्या लोकांना एकत्र करून स्वराज्याची स्थापना केली. शाहु, फुले, आंबेडकरांनी समतेची शिकवण दिली. तुकाराम, ज्ञानेश्वर, संत सावता माळी, संत चोखा मेळा, गाडगे महाराज, तुकडोजी महाराज, या संतांनी महाराष्ट्रावर सर्व धर्म समभावाचे संस्कार दिले. एवढी समृद्ध परंपरा असणाऱ्या महाराष्ट्रामध्ये आज काही राजकीय पुढारी जाती-पातीची विष पेरणी करत आहेत. अजानचा भोंगा, मंदिरातला काकडा, हरिपाठ, बुद्ध विहारातील त्रिशरण पंचशील अष्टांग गाथा हे ऐकूण दिवसाची सुरुवात करण्याची आमची परंपरा आम्ही आबाधित ठेऊ. ग्रामीण संस्कृतीचं जतन करण्याचे आव्हान यावेळी गजानन वायाळ यांनी केले. यावेळी प्रमुख उपस्थिती मध्ये अंढेरा पोलीस स्टेशनचे दुय्यम ठाणेदार वासाडे यांनी सुद्धा विचार मांडले,भरोसा येथील प्रतिष्ठित नागरिक मल्लु सेठ,भानुदास थुट्टे, संदीप काळे, नदीम देशमुख,बाबुराव पाटील ,अशोक थुट्टे पाटील, आंबादास जाधव, किसन लाला जोहरे, रामदास थुट्टे, भागवत थुट्टे, अंकुश थुट्टे पाटील, शेख सत्तार, शेख चांद भाई, मौलाना, गजानन पैठणे, शंकर बापू थुट्टे, निलेश पडघान, प्रविण लहाने, आदी मान्यवर उपस्थित होते.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button