जाहिरात
ताज्या घडामोडी

सफाई कर्मचाऱ्यांसोबत नगराध्यक्षांनी साजरी केली दिवाळी!

स्वच्छतेच्या खऱ्या दूतांसोबत आनंदाचे क्षण; सफाई कर्मचाऱ्यांचा सन्मान

Spread the love

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि. ८ नोव्हेंबर २०२६)

शहर स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यदायी ठेवण्यासाठी दिवस-रात्र मेहनत घेणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांसोबत नगराध्यक्ष, नगरसेवक व सहकाऱ्यांनी दीपावलीचा सण उत्साहात साजरा केला. स्वच्छतेचे खरे दूत असलेल्या सफाई कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.

शहराच्या स्वच्छतेसाठी अहोरात्र परिश्रम घेणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांसोबत दिवाळीचे आनंदाचे क्षण घालविताना त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. सफाई कर्मचाऱ्यांच्या आनंदात सहभागी होणे हीच खरी दिवाळी असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. त्यांच्या मेहनतीमुळेच शहर स्वच्छ व सुंदर राहते, असेही यावेळी नमूद करण्यात आले.

या कार्यक्रमाला नगराध्यक्ष प्रणोती सागर निंबोरकर, नगरसेवक सागर अरुण निंबोरकर, बांधकाम सभापती अनिल कुंघाडकर, महिला व बालकल्याण सभापती सीमा कन्नमवार, नगरसेविका अवंती धंदरे, शिल्पा गवारे यांच्यासह अन्य सहकारी उपस्थित होते.

सफाई कर्मचाऱ्यांसोबत दिवाळी साजरी करून त्यांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. यावेळी सर्वांना दीपावलीच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

जाहिरात

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button