नगराध्यक्ष ॲड. प्रणोती निंबोरकर यांच्याकडून गडचिरोलीकरांना दीपावलीच्या शुभेच्छा!
सुख, समृद्धी व आनंदाने प्रत्येकाचे जीवन उजळो; पर्यावरणपूरक दीपोत्सव साजरा करण्याचे आवाहन

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि. ८ नोव्हेंबर २०२६)
दीपावलीच्या मंगलमय पर्वानिमित्त नगराध्यक्ष ॲड. प्रणोती निंबोरकर यांनी गडचिरोली शहरातील समस्त नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. प्रत्येकाच्या जीवनात सुख, समाधान, आरोग्य आणि समृद्धी नांदो, तसेच सर्वांच्या घरात आनंदाचे वातावरण निर्माण व्हावे, अशी सदिच्छा त्यांनी व्यक्त केली.
दीपावली हा प्रकाश, आनंद आणि नवचैतन्याचा सण असून, प्रेम, आपुलकी व बंधुभाव वृद्धिंगत करणारा उत्सव आहे. नागरिकांनी हा सण उत्साहात साजरा करताना पर्यावरणाची काळजी घ्यावी, ध्वनी व वायुप्रदूषण टाळावे आणि पर्यावरणपूरक दीपावली साजरी करावी, असे आवाहन नगराध्यक्षांनी केले.
गडचिरोली शहराच्या सर्वांगीण विकासासाठी नागरिकांनी एकजुटीने योगदान द्यावे, तसेच शहरात सुख, शांती, समृद्धी आणि आनंदाचे वातावरण कायम राहावे, अशी अपेक्षा नगराध्यक्ष प्रणोती निंबोरकर यांनी व्यक्त केली.
नगराध्यक्ष ॲड. प्रणोती निंबोरकर यांच्या वतीने समस्त गडचिरोलीकरांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!
