जाहिरात
आपला जिल्हा

माओवाद्यांचा शस्त्रसाठा जप्त; ६ अग्निशस्त्रांसह स्फोटक साहित्य हस्तगत

Spread the love

लोकशाही न्युज,गडचिरोली, (दि. ७ ऑक्टोबर २०२६)

महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेलगत कोपर्शी जंगल परिसरात माओवाद्यांनी जमिनीत लपवून ठेवलेला शस्त्रसाठा गडचिरोली पोलिसांनी जप्त केला. विशेष अभियान पथक व बीडीडीएसच्या जवानांनी ६ अग्निशस्त्रांसह १० बीजीएल सेल, २१ जिवंत काडतुसे, ७ डेटोनेटर, १५० मीटर केबल वायर, मॅगझिन, वॉकीटॉकी व इतर माओवादी साहित्य हस्तगत केले.
पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली ६ ऑक्टोबर रोजी ही कारवाई करण्यात आली. काही माओवादी साहित्य घटनास्थळीच नष्ट करण्यात आले. कारवाईत सहभागी जवानांचे पोलीस अधीक्षकांनी कौतुक केले.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button