जाहिरात
राजकीय

गडचिरोली : १६ ऑगस्ट ला शिवसेना (उबाठा पक्ष) कार्यालयाचे उदघाट्न व भव्य पदाधिकारी मेळावा

Spread the love

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि.१५ ऑगस्ट २०२६)

उद्या दि. १६ ऑगस्ट २०२६ रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या गडचिरोली येथील पक्ष कार्यालयाचे उद्घाटन कार्यक्रम ठीक १२ वाजता आयोजित करण्यात आले आहे. पक्ष कार्यालयाचे उद्घाटन चामोर्शी रोडवरील कार्यालय येथे होणार आहे.या कार्यालयाचे उद्घाटन विनायक राऊत सचिव शिवसेना (उबाठा गट) यांच्या शुभहस्ते होणार असून, कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती संपर्कप्रमुख महेश केदारी हे राहणार आहे.

कार्यालयाच्या उद्घाटनानंतर लगेच कार्यकर्ता मेळावा स्थानिक इंदिरा गांधी चौक, गडचिरोली येथे ठीक १ वाजता आयोजित करण्यात आला आहे.

तरी या कार्यक्रमास सर्व शिवसेना पदाधिकारी, माजी पदाधिकारी, महिला आघाडी, युवासेना पदाधिकारी तसेच सर्व शिवसैनिकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे अशी विनंती करण्यात आली आहे.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button