जाहिरात
ताज्या घडामोडी

मनोरुग्ण सुनील रंगारी यास राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या वतीने नवीन वस्त्र व पादत्राण भेट

Spread the love

लोकशाही न्युज, चामोर्शी/घोट (दि. २० जुलै)

घोट येथील सुनील केशव रंगारी सदर मनोरुग्ण व्यक्ती संपूर्ण घोट परिसरात निःस्वार्थपणे संपूर्ण परिसरात झाड, झूड व साफसफाई चे काम करीत असतो, कुणी काही दिले तरी ठीक! नाही दिले तरी ठीक? एक वेळचे चे अन्न कुणी खायला दिले तरी चालेल,नाही दिले तरी चालेल!सुनील रंगारी घोट क्षेत्रातील संपूर्ण पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे नेहमी खाकी ड्रेस लावून राहणारा अनेकांना नमस्कार करून जय हिंद म्हणणारा निस्वार्थी असा व्यक्ती आहे.

या विषयाची माहिती राष्ट्रीय मानवाधिकार संघटन प्रदेशाध्यक्ष डॉ प्रणय खुणे यांना मिळाली, व त्यांनी सुनिलचे स्वागत केले व त्याला नवीन ड्रेस व पादत्राण घेऊन दिले, व हॉटेल उपाध्ये मध्ये येईल तेव्हा जेवण ही व्यवस्था करून दिले.व माणुसकीचा परिचय दिला समाजामध्ये अनेक लोक असे आहेत,जे खरोखरच निस्वार्थीपणे काम करतात, परंतु समाज त्यांच्याकडे कधी लक्ष देत नाही, यावेळी बोलताना डॉ, प्रणय खुणे यांनी सांगितले समाजामध्ये अशा प्रकारच्या लोकांना प्रत्येकाने मदत करावी अश्या लोकांना पैशाची गरज नसते तर त्यांना अन्न पाणी देऊन जरी मदत केली तरी त्यांच्या पोटाच्या खळगीचा प्रश्न नक्कीच मिटेल, अशी भावना व्यक्त केले.

यावेळी मानवाधिकार संघटन जिल्हा उपाध्यक्ष नानु उपाध्ये, भाजपा घोट मंडळ अध्यक्ष राकेश सरकार,आदिवासी आघाडी अध्यक्ष,विलास उईके,भोजराज रामटेके राष्ट्रीय मानवाधिकार संघटन नेते महेश विस्वास, तालुका सचिव दिनेश मुजुमदार व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button