गडचिरोली : शहरातील तलावात शेकडो माशांचा मृत्यू

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि. १९ जुलै)
गडचिरोली शहराच्या मध्यभागी असलेल्या तलावात अनेक माशांचा मृत्यू झाल्याची घटना आज उघडकीस आली आहे. मृत्यू झालेले मासे पाण्यावर तरंगताना दिसत असल्याने ते मृतक मासे बघनाऱ्यांची ची गर्दी ओसंडून वाहत आहे. माशांचे मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.मृत्यू झालेल्या माशात सवडा, कथला, रो, अशा अनेक माशांचा समावेश आहे.मृत्यू पावलेल्या माशांमध्ये पाच किलो ते साधारणतः पंधरा किलो पर्यंतचे मासे आहेत.

मृत्यू झालेल्या माशांचे नमुने प्रयोग शाळेमध्ये तपासणी करिता पाठवण्यात आलेले आहे. त्या माशांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला आहे तपासणी नंतरच कळणार आहे.तलावात मच्छीमारी करणाऱ्या भोई समाजावर अनेक माशांच्या मृत्यूमुळे आर्थिक नुकसान झाले आहे.
अनेक माशांच्या मृत्यूमुळे तलाव परिसरात खूप मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरलेली आहे. त्या दुर्गंधीचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी गडचिरोली वासीयांनी नगरपरिषद प्रशासनाकडे केलेली आहे.
