जाहिरात
ताज्या घडामोडी

गडचिरोली : पाच वर्षाचे मानधन गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी देणार

नगराध्यक्ष ॲड. प्रणोती निंबोरकर व नगरसेवक सागर निंबोरकर यांचा संकल्प

Spread the love

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि.२१ जुलै)

आर्थिक परिस्थितीमुळे कोणत्याही होतकरू आणि गुणवंत विद्यार्थ्याचे शिक्षण अर्धवट राहू नये, या सामाजिक जाणिवेतून गडचिरोली नगर परिषदेच्या नगराध्यक्ष ॲड. प्रणोती निंबोरकर आणि नगरसेवक सागर निंबोरकर यांनी एक अत्यंत स्तुत्य आणि प्रेरणादायी उपक्रम हाती घेतला आहे. गरजू, पितृछत्र हरपलेल्या व गुणवंत विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी तब्बल २० लाख रुपयांपर्यंतची आर्थिक मदत टप्प्याटप्प्याने उपलब्ध करून देण्याचा त्यांनी संकल्प जाहीर केला आहे.

नगराध्यक्ष ॲड. प्रणोती निंबोरकर यांनी आपल्या संपूर्ण पाच वर्षांच्या कार्यकाळातील मानधनाची सुमारे १२ लाख रुपयांची संपूर्ण रक्कम या समाजोपयोगी कार्यासाठी समर्पित करण्याचा निर्णय घेतला आहे. यासोबतच नगरसेवक सागर अरुण निंबोरकर हेही आपल्या स्वखर्चातून आर्थिक योगदान देणार असून, दोघांच्या संयुक्त प्रयत्नातून एकूण २० लाख रुपयांपर्यंतची मदत गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी खर्च करण्यात येणार आहे.

गडचिरोली शहरातील कोणत्याही होतकरू विद्यार्थी की केवळ आर्थिक अडचणीमुळे किंवा पालकांचे छत्र हरपल्यामुळे शिक्षणापासून वंचित राहू नये हाच त्यामागील उद्देश आहे शिक्षणाच्या माध्यमातून समाजाला सक्षम आणि सशक्त बनवण्याचा हा आमचा एक प्रामाणिक आणि मनापासून केलेला प्राधान्य असल्याची भावना यावेळी नगराध्यक्ष प्रणोती निंबोरकर व नगरसेवक सागर निंबोरकर यांनी व्यक्त केला आहे.

आपले मानधन व स्वतःच्या निधी थेट समाज कार्यासाठी देऊन शिक्षणाची गंगा घराघरात पोहोचवण्याचा हा निर्णय अत्यंत कौतुकास्पद ठरत आहे या संवेदनशील आणि सामाजिक भान जपणाऱ्या उपक्रमाचे गडचिरोली शहरासह सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button