जाहिरात
राजकीय

२६ मे ला नवनियुक्त काँग्रेस कमेटी जिल्हाध्यक्ष अॅड. विश्वजीत कोवासे यांचा पदग्रहण सोहळा व शेतकरी मेळावा

काँग्रेस पदाधिकाऱ्यांची पत्रकार परिषदेतून माहिती

Spread the love

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि.२३ मे)

२६ मे रोज मंगळवार २०२६ रोजी गडचिरोली जिल्ह्याचे काँग्रेस कमिटी चे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष अॅड विश्वजीत मारोतराव कोवासे यांचा पदग्रहण सत्कार सोहळा व शेतकरी मेळावा आयोजित केला असल्याची माहिती आज (दि. २३ मे) रोज शनिवार ला चामोर्शी रोड वरील कात्रटवार कॉम्प्लेक्स येथे झालेल्या पत्रकार परिषद च्या माध्यमातून काँग्रेस कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.

या होणाऱ्या कार्यक्रमाला गडचिरोली जिल्ह्यातील तमाम काँग्रेसचे कार्यकर्ते पदाधिकारी सर्व प्रदेशचे पचाधिकारी, युवक काँग्रेस,एनएसयुआय, महिला काँग्रेस, सेवादल, ज्येष्ठ पदाधिकारी, सर्व सेलचे जिल्हाध्यक्ष, पदाधिकारी, यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे अशी विनंती करण्यात आली आहे.

नवनिर्वाचित जिल्हाध्यक्षाच्या सत्कार सोहळ्याच्या कार्यक्रमाला खालील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन विजय वडेट्टीवार विधीमंडळ गटनेते (काँग्रेस) तथा आमदार ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्र हे राहणार आहेत.तसेच प्रमुख उदयभानु चिब राष्ट्रीय अध्यक्ष, भारतीय युवक काँग्रेस, डॉ. नामदेव किरसान खासदार गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्र, मारोतराव कोवासे माजी खासदार गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्र, शिवराजदादा मोरे प्रदेश अध्यक्ष महाराष्ट्र युवक काँग्रेस, रामदास मसराम आमदार आरमोरी विधानसभा क्षेत्र, अॅड.अभिजीत वंजारी आमदार विधान परिषद, सुधाकर अडबाले आमदार विधान परिषद, महाराष्ट्र प्रभारी कुणाल चौधरी,महेंद्र ब्राह्मणवाडे माजी अध्यक्ष, गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी, अजय चिकारा राष्ट्रीय महासचिव, भारतीय युवक काँग्रेस तथा महाराष्ट्र प्रभारी, एनएसयुआय प्रदेशाध्यक्ष सागर साळुंखे
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव, रविंद्र दरेकर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी महासचिव, अजय कंकडालवार, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सचिव पंकज गुड्डेवार,जिल्हा परिषद चे माजी सदस्य राम मेश्राम, माजी नगरसेवक बंडू शनिवारे हे हजर राहणार आहेत.

या सर्व पाहुण्यांच्या उपस्थिती मध्ये नवनियुक्त काँग्रेस कमेटी जिल्हाध्यक्ष अॅड.विश्वजीत कोवासे यांचा पदग्रहण सोहळा व शेतकरी मेळावा होणार आहे. सदर कार्यक्रम सुरेश सावकार पोरड्डीवार यांचे घरासमोरील पटांगणात २६ मे मंगळवार ला दुपारी ४ वाजता होणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.

आज झालेल्या पत्रकार परिषदेला राम मेश्राम, बंडू शनिवारे, पंकज गुड्डेवार, श्रीकांत देशमुख, रमेश चौधरी, पराग पोरड्डीवार,अर्चना खेवले, नंदू कायरकर,(नगरसेवक) रजनीकांत मोटघरे, रुपेश टिकले,नितेश राठोड, माधुरी मडावी हे हजर होते.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button