जाहिरात
आपला जिल्हा

१५ वर्षापासून प्रलंबित बलात्काराच्या खटल्यातील आरोपीची निर्दोष मुक्तता

जिल्हा व सत्र न्यायालयाचे आदेश

Spread the love

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि.१३ फेब्रुवारी)

गडचिरोली येथील जिल्हा न्यायालयात १५ वर्षांपासून प्रलंबित बलात्काराच्या खटल्यातील आरोपीची जिल्हा व सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. महारु मडावी (रा.चिचटोला, ता. कुरखेडा) असे मुक्तता झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

खटल्याची पार्श्वभूमी अशी की, ३ ऑक्टोबर २००९ रोजी दुपारी ३ वाजताच्या सुमारास कुरखेडा तालुक्यातील एका गावातील पीडित महिला गावानजीकच्या बोडीवर कपडे धुण्यासाठी गेली होती. तेव्हा महारु मडावी हा आपल्या शेतातून अंतर्वस्त्र घालून बोडीवर आला. त्यानंतर त्याने पीडित महिलेचा गळा दाबून तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध प्रस्थापित केले, अशा आशयाच्या तक्रारीवरुन कुरखेडा पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरु केला.

या गुन्ह्यात पोलिसांनी आरोपी महारु मडावी यास अटक करुन ९ डिसेंबर २००९ रोजी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. दरम्यानच्या काळात न्यायालयाने आरोपीचा जामीन मंजूर केला होता. पुढे न्यायालयाने आरोपीविरुद्ध खटल्याची पैरवी सुरु केली. परंतु आरोपी हा न्यायालयात नियमित गैरहजर राहत असल्याने न्यायालयाने त्याच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट काढला. त्यामुळे पोलिसांनी महारु मडावीस २०२४ मध्ये पुनश्च अटक करुन कारागृहात रवानगी केली. तेव्हापासून आरोपी महारु मडावी हा कारागृहात बंदिस्त होता.

या खटल्यात आरोपीच्या विनंतीवरुन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत हे प्रकरण पुढील पैरवीकरिता लोक अभिरक्षक कार्यालयाकडे सोपविण्यात आले. आरोपीच्या वतीने अॅड. संजय भट यांनी मोफत विधी सेवा पुरवून बाजू मांडली. बुधवारी (दि. ११) या प्रकरणाचा निकाल लागला. या प्रकरणात सरकारी पक्ष आरोपीविरुद्ध न्यायालयात सबळ पुरावा सादर करु शकला नाही. त्यामुळे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अनिरुद्ध टिकले यांनी बचाव पक्षाचा युक्तीवाद ग्राह्य मानून आरोपी महारु मडावी याची बलात्काराच्या खटल्यातून निर्दोष मुक्तता करण्याचा आदेश पारीत केला.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button