गडचिरोली : शहर स्वच्छतेसाठी ‘ऑटोमॅटिक स्वीपिंग मशीन’ चे लोकार्पण

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि.१२ फेब्रुवारी)
गडचिरोली शहराच्या स्वच्छता व पर्यावरण संवर्धनासाठी आमदार डॉ. मिलिंद नरोटे गडचिरोली विधानसभा क्षेत्र यांच्या प्रयत्नातून, लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड यांच्या CSR निधीतून गडचिरोली नगर परिषदेस ‘ऑटोमॅटिक स्वीपिंग मशीन’ उपलब्ध करून देण्यात आली आहे.
या यंत्राचा लोकार्पण सोहळा आज सकाळी चामोर्शी मार्गावरील कर्तव्य कक्ष येथे माजी खासदार अशोक नेते, आमदार डॉ. मिलिंद नरोटे गडचिरोली विधानसभा क्षेत्र यांचे शुभ हस्ते व मुक्तेश्वर काटवे आरोग्य व स्वच्छता सभापती, नगर परिषद गडचिरोली, सूर्यकांत पिदुरकर, मुख्याधिकारी,नगर परिषद, गडचिरोली व श्री नटराजन एम.उपाध्यक्ष, लॉईड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड, गडचिरोली यांच्या उपस्थितीत पार पडला.
लोकार्पण सोहळ्याला माजी जिल्हा अध्यक्ष प्रशांत वाघरे, किसान मोर्चा.प्रदेश सचिव रमेश भुरसे, महिला मोर्चा प्र.सचिव रेखा डोळस, बांधकाम सभापती अनिल कुनघाडकर ,शिक्षण सभापती हर्षल गेडाम, नगरसेविका योगिता पिपरे नगरसेविका ,वर्षा शेडमाके, नगरसेवक रमेश चौधरी,सतिश विधाते,भाजयुमो चे जिल्हाध्यक्ष मधुकर भांडेकर, समन्वयक प्रमोद पिपरे,जिल्हा उपाध्यक्ष अरुण हरडे,अनिल पोहनकर,सुधाकर येंगदलवार, अविनाश महाजन, अविनाश विश्रोजवार, दिपक सातपुते,लक्ष्मी कलंत्री यांची प्रमुख उपस्थिती होती.
गडचिरोली शहराच्या स्वच्छतेचा नवा संकल्प करण्यात आला. या मशिनच्या वापरामुळे मानवी श्रमाची बचत होऊन मुख्य मार्गांची सफाई कमी वेळात पूर्ण होणार आहे. कार्यक्रमाचे संचालन चेतन गोरे व आभार प्रदर्शन नगर परिषदेच्या वतीने करण्यात आले. या सोहळ्याला नागरिक व विविध क्षेत्रांतील प्रतिष्ठित व्यक्ती मोठ्या संख्येने उपस्थित होते.
