जाहिरात
आरोग्य

​शासकीय रुग्णालयांमध्ये मोफत उपचार कायम

शुल्काबाबतच्या बातम्यांचे सार्वजनिक आरोग्य विभागाकडून खंडन

Spread the love

लोकशाही न्युज,​( दि.१२ फेब्रुवारी)

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या नियंत्रणाखालील शासकीय रुग्णालयांमध्ये तपासणी आणि उपचार पूर्वीप्रमाणेच पूर्णपणे मोफत सुरू राहणार आहेत. काही वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेल्या ‘सरकारी रुग्णालयांत उपचार बंद’ किंवा ‘शुल्काची आकारणी’ या बातम्या वस्तुस्थितीला धरून नसल्याचे स्पष्टीकरण सार्वजनिक आरोग्य विभागाने दिले आहे.

​याबाबत अधिक माहिती देताना विभागाने स्पष्ट केले आहे की,
​मूळ निर्णय: शासन निर्णय दि. २३.०८.२०२३ अन्वये सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सर्व रुग्णालयांमध्ये मोफत उपचारांची सुविधा लागू करण्यात आली आहे आणि ती आजही कायम आहे.
​तांत्रिक चूक: दि. १६.०१.२०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या ‘नागरिकांच्या सनदेत’ (Citizen’s Charter) तांत्रिक कारणास्तव २०१५ मधील जुन्या दरपत्रकाचा समावेश चुकून झाला होता. यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला.

​दुरुस्ती: ही चूक लक्षात येताच शासनाने दि. ०९.०२.२०२६ रोजी तातडीने शुद्धीपत्रक काढून सदर दरांचा समावेश सनदेतून वगळला आहे.

​सार्वजनिक आरोग्य विभागाचे आवाहन
!!!
शासकीय रुग्णालयांमध्ये तपासणी, उपचार आणि सेवांसाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. सर्व शासकीय रुग्णालयांत आरोग्य सेवा मोफत पुरवण्याचे धोरण राज्य शासनाने कायम ठेवले आहे.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button